संदिप सुरडकर, नागपुर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- राज्य सरकार शासकीय नौकऱ्यात खाजगीकरण करून सरकारी नोकरी बंद करण्यात येत आहे. त्यामुळे सरकारी नोकरीसाठी मेहनत घेणाऱ्या विद्यार्थी पुढे बेरोजगार घुमताना दिसणार आहे त्यामुळे या तरुणात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे आज सरकारी धोरणाविरोधात बेरोजगार युवकांचे जोरदार आंदोलन केले.
सरकारी नोकऱ्यांचे खाजगीकरण करीत असलेल्या सरकारच्या धोरणा विरोधात नागपुरातील युवकांनी आंदोलन केले. व्हेरायटी चौकातील गांधीजींच्या पुतळ्यापुढे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून संविधान चौकापर्यंत रॅली काढली. यावेळी या रॅलीत सहभागी झालेल्या युवकांनी हाताला काळी पट्टीबांधून आणि संविधान चौकात चहा, पकोडे विकून सरकारचा निषेध केला.
सरकारी पदभरतीचे कंत्राटीकरण रद्द करावे, तत्काळ शिक्षक भरती करावी, अशी मागणी या युवकांनी केली. सरकार आता तहसिलदार कंत्राटी पद्धतीने भरीत आहे, पुढे जिल्हाधिकारीही कंत्राटीच भरतील, असा संतापही युवकांनी यावेळी व्यक्त केला. स्टुडंट्स राईट्स असोसिएशन ऑफ इंडियाचे उमेश कोर्राम यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनात युवा ग्रॅज्युएट फोरम, परिवर्तन पॅनल, ओबीसी युवा अधिकार मंच, ओबीसी जनमोर्चा आदी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

