मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सिरोंचा:- सिरोंचा तालुका मुख्यालय पासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या धर्मपुरी गावात महामार्गावर एका तेलंगाणा राज्यातील तीलवाई गावातील येमुर्ला पोचम यांचे अपघात होऊन रस्त्यावर पडून होते. ही माहिती धर्मपुरी गावातील सागर भाऊ मूलकला यांचे मित्रपरिवार कडून मिळताच त्यांनी वेळेचे विलंब न करता धर्मपुरी येथे घटनास्थळी रात्री 8 वाजता पोहोचून रस्त्यावर पडून असलेल्या जखमी इसम येमुर्ला पोचम यांना आपल्या दुचाकीने घेऊन सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
सध्या त्यांचावर उपचार सुरू असून सागर मूलकला यांनी जखमी येमुर्ला पोचम यांचे कुटुंबियांना विषयाची माहिती देण्यात आली आहे,
सामाजिक कार्यत नेहमी दिवस / रात्र अग्रेसर राहणारे मूलकला फाऊंडेशनचे प्रमुख – सागर मूलकला, आणि मित्रमंडळी – नवीन दिकोंड यांचे तालुक्यातील जनतेकडून सर्वत्र कौतुक केले जात आहे,

