मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलनात वना नदी संवर्धन समिती या सेवाभावी संस्थेचा सेवा सत्कार करण्यात आला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलन आयोजित केले गेले होते. हा कार्यक्रम वेगवेगळ्या टप्प्यामध्ये घेण्यात आला. या संमेलनाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्या हस्ते करण्यात आले.
दिनांक २ ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री ह्यांचे जयंतीचे अवचीत्य साधून श्री संत भोजाजी महाराज देवस्थान, श्रीक्षेत्र आजनसरा जी. वर्धा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले. संमेलनाचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस (उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य) ह्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विशेष अतिथी चंद्रशेखर बावनकुळे हे होते. दरवर्षी प्रमाणे ह्याही वर्षी वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक आमंत्रित करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ह्यांचे ग्राम आणि ग्रामगीता प्रबोधन कार्य नवजिवित करण्याचे उत्कट प्रयत्न केले जातात. उद्घाटन समारंभ देवेंद्र फडणवीस ह्यांच्या हस्ते होऊन त्यांचे शब्दसुमनानी कार्यक्रमाला सुरुवात झाली.
यावेळी त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ह्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. त्यांनतर नंतरच्या सत्रात देश हा देवची पवित्र; अपणा ग्राम ही तिर्थ बनाओ; मंदिरे.. लोकशिक्षणाची पाठशाळा; अश्या विविध ग्रामगितेप्रमाणे ग्राम विस्ताराला हातभारांच्या विषयावर परिसंवाद आयोजित केला गेला. शेवटी समारोप कार्यक्रमात पुष्पाताई बोंडे अ.भा.श्री गुरुदेव मंडळ अध्यक्षा, संचालक मंडळच्या हस्ते हिंगणघाट येथील वना नदी च्या सेवेत कार्यरत असलेली वना नदी संवर्धन समिती हि. ह्या सेवाभावी संस्थेचा सेवा सत्कार प्रदान करून गौरव करण्यात आला.
वना नदी संवर्धन समिती मागील ५ वर्षा पासुंन निरंतर वाना नदीचे संवर्धनाचे कार्य करत असल्यामुळे त्याची दखल सेवा शब्दाने घेत त्यांचे प्रोत्साहनपर अभीनंदन केले गेले. पुरस्कार चा स्वीकार समितीचे अध्यक्ष रुपेश लाजुरक ह्यांच्या तर्फे संदेश मून ह्यांनी केला. समितीच्या वतीने सर्व गाव हे नदीवरच बसत असून त्यात नदी ही प्रत्येक गावासाठी पूजनीय जीवनदायिनी असते. त्यामुळे तिची पूजा करावी आणि नदीस्वच्छ्ता ठेवण्यात स्वतः उदाहरण बनून जागरूकता पसरावी असा संदेश वना नदी संवर्धन समितीने उपस्थितांना दिला. ह्या वेळी आमदार चंद्रशेखरजी बावनकुळे (अध्यक्ष महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी,) स्वागताअध्यक्ष आमदार समिर कुणावार, खासदार रामदास तडस, समेलनाध्यक्ष लक्ष्मणजी गमे, कार्यक्रम आयोजक डाॅ. विजय पर्बत (अध्यक्ष श्री संत भोजाजी महाराज देवस्थान आजनसरा) उपस्थित होते.