मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- दिनांक 5 ऑक्टोंबर गुरुवार रोजी 1.00 वाजता कुणबी – ओबीसी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येते भव्य महामोर्चा काढण्यात आला. यावेळी आपल्या विविध मागण्या निवेदन जिल्हाधिकारी याच्या मार्फत केन्द्र शासन व महाराष्ट्र शासनाकडे निवेदन सादर करण्यात आले.
त्यात पुढील मागण्या : १)ओबीसीची जातनिहाय जनगणना करा २) मराठा समाज बांधवांना ओबीसी मधून आरक्षण देऊ नये 3) मराठा समाजाला कुणबी पोटजाती मधुन शासनाच्या परिपत्रक मधुन वगळण्यात यावे. या प्रमुख मागण्या सह इतर मागण्यांना घेऊन कुणबी – ओबीसी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येते भव्य महामोर्चा काढण्यात आले या महामोर्चाला बहुसंख्येने कुणबी समाज उपस्थित होते.
या मोर्चात माजी मंत्री तथा आमदार अनिल देशमुख, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार अभिजित वंजारी, आमदार सुधाकर अडबाले,आमदार कृष्णा गजबे, माजी आमदार डॉ. अविनाश वारजूरकर, माजी मंत्री व आमदार परीनय फुके,अँड . गोविंदराव भेंडारकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, गुरुदेव भाऊ भोपये अध्यक्ष राष्ट्रीय ओबिसी समाज संघटना जिल्हा गडचिरोली, ओबीसी कृती समितीचे समन्यक अरुण पाटील मुनघाटे, दादाजी चापले, माजी जिल्हा परिषद सदस्य मनीषा दोनाडकर, वेणुदास वाघरे, दादाजी किनेकर, पांडुरंग घोटेकर, अविनाश पाल, खुशाल राऊत, शेषराव येलेकर, अतुल येलमुले, जयंत येलमुले, प्रमोद भगत, शालिकराम विधाते, प्रभाकर कुबडे, दिवाकर निसार, वसंत राऊत, दौलतभाऊ भोपये, हेमंत मशाखेञी, रत्नदीप मशाखेञी, संजय ठाकरे, रमेश चौधरी, अभिजित कोरडे, तसेच विजय मशाखेञी, तसेच जेष्ठ कुणबी समाज हजारोच्या बहुसंख्येने – कुणबी समाज व ओबीसी समाजबांधव या मोर्चात सहभागी झाले.

