प्रशांत जगताप संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- प्रसिद्ध कवयित्री आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ. मयुरीताई टेंभरे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी (दि. 8) रोजी सामाजिक विषयांची सांगड घालत एका वेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या अनाठायी खर्चाला फाटा देत, अवास्तव खर्च कमी करून नागपूर शहरातील अस्थिव्यंग, अपंग मुलांची स्नेहांगण दिव्यांग शाळा तसेच वसतिगृहातील मुलांन बरोबर त्यांनी आपला वाढदिवस केक कापून विविध उपक्रम राबवत दिव्यांग मुलानं सोबत आनंदउत्सव साजरा केला त्यावेळी या सर्व मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
सौ. मयुरीताई टेंभरे या एका अभिजात कवयित्री असून संपूर्ण आयुष्यच संगीतमय करणारी तरल शब्द सौंदर्याची स्वामींनी आहेत. त्याच्या लेखणीतून कागदावर उतरलेले शब्दचित्र जणू सत्याची असत्यावर मिळवलेली हुंकार आहे. त्यांनी भावस्पर्शी कविता वाचतांना त्यांच्यातील रसिकता पदोपदी जाणवते. त्यांच्या अनेक कविता मधून अतिशय समर्थपणे त्यांनी जीवनाविषयी वास्तव्यवादी वर्णन करून जीवनपाट सजवला आहे. मयुरीताई यांच्या शब्दा शब्दांतून प्रतिभा नुसती झिरपते आहे. असे सरस आणि सोज्वळ काव्य मराठी भाषेत फार थोडे आहे आणि मौज ही आहे. की जुन्यात चमकेल आणि
नव्यात झळकेल असे त्याचे तेज आहे.

सौ. मयुरी टेंभरे यांचा वाढदिवस स्नेहांगण दिव्यांग शाळा येथे साजरा करण्यात आला. यावेळी अपंग मुलांशी संवाद साधण्यात आला, त्याच बरोबर सदर मुलांची दैनंदिनी, अभ्यास पद्धती व सामाजीक वावरण्याच कौशल्य समजून घेत नवं चैतन्यमय अश्या वातावरणात हा वाढदिवस अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी येथे प्रसिद्ध चित्रपट कॉस्च्युम डिझायनर सुप्रिया ढोके, प्रसिद्ध मॉडेल व मिस महाराष्ट्र 2023 प्रगती येसूनसुरे, कुणाल टेंभरे, शुभांगी रामटेके, प्रशांत ढोमंणे, सुरज सातफळे, कोमल उगेमुगे सह अनेक मित्र परिवार यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी केक कापून या सर्व विद्यार्थांना अल्पोहार, फळ, बिस्कीट, चॉकलेट, बेडचे वाटप करण्यात आले. त्यानंतर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात शाळेतील सर्व विद्यार्थांनी सहभागी होऊन खूप छान चित्र रंगवले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. यावेळी स्नेहांगण दिव्यांग शाळा व वस्तीगृहाच्या व्यवस्थापक मंडळाने सौ. मयुरीताई टेंभरे याच्या वाढदिवसा निर्मित आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमाचे स्वागत केले व आभार मानले.
यावेळी सौ. मयुरी टेंभरे म्हणाल्या की, अशाच प्रकारे इतरांनी आपला वाढदिवस गोरगरीब व अपंग विद्यार्थ्यांना मदत करून साजरा केल्यास वाढदिवस सार्थकी लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी यांच्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या व छान उपक्रम राबविले म्हणून आभारही मानले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप 9766445348/7385445348

