Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

गुन्हे शाखा युनिट-४ ची दमदार कामगिरी ! नदी व नाल्यावाटे येऊन घरफोडी करणारे सराईत केले जेरबंद….

पंकेश जाधव by पंकेश जाधव
October 10, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
गुन्हे शाखा युनिट-४ ची दमदार कामगिरी ! नदी व नाल्यावाटे येऊन घरफोडी करणारे सराईत केले जेरबंद….
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो 7020794626

गुन्हे शाखा युनिट-४, पुणे शहर.

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि. ०९/१०/२०२३ रोजी गुन्हे शाखा युनिट-०४ कडील पोलीस उप निरीक्षक पाटील व युनिट-४ कडील पोलीस स्टाफ असे मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश माने यांचे मार्गदर्शन व सुचनेप्रमाणे खडकी पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना, रेंज हिल्स ते खडकी पोलीस ठाणेकडे जाणा-या रोडने जात असताना रेल्वेच्या छोट्या बोगद्याजवळील म्हसोबा मंदीराजवळ चार आरोपींना युनिट४ कडील पथकाने शिताफीने ताब्यात घेतले. आरोपी नामे १) मुकेश ग्यानसिंग भुरीया, २) सुनिल कमलसिंग अलावा, ३) हरसिंग वालसिंग ओसनिया, ४) सुंदरसिंग भयानसिंग भुरीया सर्व आरोपी ता.. कुक्षी, जि. धार राज्य मध्यप्रदेश येथील आहेत. आरोपींच्या ताब्यामध्ये रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने व घरफोडी करण्याची लोखंडी कटावणी, स्क्रुड्रायव्हर, लोखंडी पोपट पाना, लोखंडी कटर, गोफन अशी हत्यारे असा एकुण किंमत रु. ८,८४,८३०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्याकडे तपास करता त्यांनी एप्रिल, मे, सप्टेंबर व ऑक्टोंबर महीन्यामध्ये पुण्यात येवून येरवडा, धानोरी, खडकी, विश्रांतवाडी, कोंढवा या परिसरात घरफोडी चो-या केल्या असल्याचे सांगीतले.

सदर आरोपीतांकडुन (१) खडकी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ३५० / २०२३ भा. द. वि. कलम ४५७, ३८०, (२) खड़की पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ३७४ / २०२३ भा. द. वि. कलम ३९२, ३४, (३) खडकी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ३७५/२०२३ भा.द.वि. कलम ४५७, ३८० (४) विश्रांतवाडी पोलीस ठाणे गु.र.नं. २६७/ २०२३ भा.द.वि. कलम ४५७, ३८०, (५) येरवडा पोलीस ठाणे गु.र.नं. ३५३ / २०२३ भा.द.वि. कलम ४५७, ३८०, ३४ (६) विमानतळ पोलीस ठाणे गु.र.नं. १८२ / २०२३ भा.द.वि. कलम ४५७, ३८०, ३४, (७) कोंढवा पोलीस ठाणे गु.र.नं. १०३५ / २०२३ भा.द.वि. कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हे उघडकीस आलेले आहेत. सदर आरोपी व जप्त मुद्देमाल हा पुढील कारवाईकामी खडकी पोलीस ठाणेच ताब्यात देण्यात आलेले आहे.

सदर आरोपी घरफोडी चोरी करण्यासाठी लागणारी हत्यारे, घातक शस्त्रे व दगड भिरकावुन मारण्यासाठी गोफन यासह काही कालावधीसाठी पुण्यामध्ये येतात. सदर आरोपी पुण्यामध्ये नदी-नाले, दाट झाडी अशा ठिकाणी दिवसाचे वेळी वास्तव्य करतात. नमुद आरोपी मध्यरात्रीचे वेळेस घरफोडी चोरी करण्यासाठी बाहेर पडतात. आरोपी नदी नाल्यांचे कडेने फिरत फिरत जातात व शेजारी असलेल्या अपार्टमेंट किंवा बंगलो सोसायटीमध्ये प्रवेश करुन बंद फ्लॅट, बंगलो फोडुन घरफोडी चोरी करतात. आरोपी चोरी करण्यासाठी एखाद्या ठिकाणी शिरल्यानंतर त्यांना कोणी प्रतिकार केल्यास ते त्यांचे कडील घातक शस्त्रे यांचा वापर करतात किंवा गोफणचा वापर करुन दगडे मारुन पळुन जातात. सदर आरोपीतांनी यापूर्वी भाऊ पाटील रोड, बोपोडी खडकी परिसरातील विविध अपार्टमेंटमध्ये अशाच प्रकारे घरफोडी चो-या केल्या होत्या. सदर परिसरामध्ये नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. मा. वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे सदर आरोपीतांचा गुन्हे शाखा युनिट ४ चे पथकाने शिताफिने पकडलेले आहे.

सदरची उल्लेखनिय कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. अमोल झेंडे, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-२ श्री. सतिश गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गणेश माने यांचे मार्गदर्शनात युनिट ४ कडील सहा. पोलीस निरीक्षक श्री. विकास जाधव, पोलीस उपनिरीक्षक श्री. जयदीप पाटील, महेंद्र पवार व पोलीस अंमलदार अजय गायकवाड, हरिष मोरे, प्रविण भालचिम, सारस साळवी विठ्ठल वाव्हळ, संजय आढारी, विनोद महाजन, स्वप्निल कांबळे, वैभव रणपीसे, अशोक शेलार, रमेश राठोड, वैशाली माकडी, मनोज सांगळे, शितल शिंदे यांनी केली आहे.

Previous Post

कवयित्री मयुरीताई टेंभरे यांनी आपला वाढदिवस अपंग मुलानं बरोबर केला साजरा.

Next Post

१ गावठी पिस्टल, १२ सिंगल वोर रायफल, ५६ जिवंत राउंड तसेच बनावट लायसन्ससह, बेकायदेशीरपणे अग्निशस्त्र बाळगणारे वाहय राज्यातील इसमांना वानवडी तपास पथकाने केले जेरबंद

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
१ गावठी पिस्टल, १२ सिंगल वोर रायफल, ५६ जिवंत राउंड तसेच बनावट लायसन्ससह, बेकायदेशीरपणे अग्निशस्त्र बाळगणारे वाहय राज्यातील इसमांना वानवडी तपास पथकाने केले जेरबंद

१ गावठी पिस्टल, १२ सिंगल वोर रायफल, ५६ जिवंत राउंड तसेच बनावट लायसन्ससह, बेकायदेशीरपणे अग्निशस्त्र बाळगणारे वाहय राज्यातील इसमांना वानवडी तपास पथकाने केले जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In