पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो 7020794626
वानवडी पोलिस स्टेशन पुणे शहर
( जम्म काश्मिर राज्य, जिल्हा मॅजेस्ट्रेट यांचे बनावट लायसन्स बाबत अहवाल प्राप्त )
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि. २५/०७/२०२३ रोजी २१/३० वा. ते २७/०७/२०२३ रोजी दरम्यान मा. अप्पर पोलीस आयुक्त सौ. गुन्हे, पुणे शहर यांचे आदेशान्वये ऑल आऊट /काविंग ऑपरेशन राबविण्यात येत असताना जातीय तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्ती समाज विघातक कृत्य करणाऱ्या संघटना, व्यक्ती. रेकॉडवरील गुन्हेगार हिस्ट्रिशिटर, हॉटेल, लॉजेस तपासणी करणे, दहशतवादी कृत्याचे अनुषंगाने तपासणी करण्याचे आदेश मा. वपोनि श्री. भाउसाहेब पटारे यांचेकडुन प्राप्त झाले होते. त्याप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी पोलीस अधिकारी पोउपनि संतोष सोनवणे व तपास पथकातील पोलीस अंमलदार राहुल माने, पोना / गोसावी, पोअं/ संदिप साळवे, पोहवा / कदम, संतोष नाईक, अमजद पठाण, असे वानवडी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदारमार्फत बातमी मिळाले प्रमाणे रामटेकडी इंडस्ट्रियल एरिया लेन नं. १. आण्णा भाऊसाठे उद्यानामागे रोडलगत एक इसम संशयितरित्या सफेद रंगाचे अॅक्टिवा मोपेड गाडीवर बसुन रिमझिम पावसात विनाकारण थांबलेला असुन तसेच तो कोणतातरी दखलपात्र गुन्हा करण्याचे उद्देशाने वावरत असल्याचे व त्यांचेकडे अग्निशस्त्र असण्याची दाट शक्यता असलेबाबत गुप्त बातमीदाराव्दारे माहिती मिळाल्याने, सदरबाबत मा. वपोनि श्री. भाउसाहेब पटारे यांना कळविली असता, त्यांनी कारवाई करणेबाबत सुचना देवून सुचनांप्रमाणे वर नमूद स्टाफ यांनी सापळा रचून घेराव घालुन छापा कारवाई करून त्या इसमास ताब्यात घेतले असता, त्याचेकडे वानवडी पोलीस ठाणे हददीत संशयास्पदरिता वावरणेचे कारण विचारले असता, त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. सबब आवश्यक बळाचा वापर करून तपास केला असता, त्याचेकडे गावठी पिस्टल मिळून आल्याने जप्त करण्यात आले आहे.
येणेप्रमाणे आरोपीत यांचे मिळून आलेले गावठी पिस्टल व त्याचेकडील दुचाकी वाहनासह एकुण १,६०,६४०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपीत यांचे विरोधात भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अटक करणेत आलेल्या आरोपीत यांची माहिती
संतोष जैनाथ शुक्ला, वय ५० वर्षे राहणार भागीरथी नगर, साडे सतरा नळी, हडपसर पुणे मुळ
राहणार मु.पो. कनेव्हरा, इलाहबाद, उत्तर प्रदेश, सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक संतोष सोनवणे व तपास पथक, हे करत असताना, वर नमूद गुन्हयातील आरोपीत यांचेकडील बनावट लायसन्स मिळुन आल्याने सदरचे बनावट लायसन्स व अग्निशस्त्र बाबतचे तपास करीत असताना खालील नमूद आरोपीत यांना अटक करणेत आलेले आहे.
१)संतोष जैनाथ शुक्ला, वय ५० वर्षे राहणार भागीरथी नगर, साडे सतरा नळी, हडपसर पुणे मुळ राहणार मु.पो. कनेव्हरा, इलाहबाद, उत्तरप्रदेश,२)रामप्रसाद बुध्दा पासवान, वय ३५ वर्षे, मुळ रा. गोपीपुर जरार, जमरावो जि. फतेपूर उत्तरप्रदेश सध्या रा. भिंगारवाडी, ता. पनवेल, जि. रायगड, ३) राजेश बबलु पासवान, वय ३५ वर्षे, रा. भरसवा फतेपुर अशोकनगर, उत्तरप्रदेश, ४)दिनेश जगदीश पासवान, वय ५४ वर्षे, रा. गोपीपुर, जरार, जमरावी, जि. फतेपुर, उत्तरप्रदेश ५)इम्रान मोहंमद जिमी खान वय ३० वर्षे, मुळ राहणार- राजोरी, ता. काटरंगा, जि. राजोरी, राज्य
जम्मु काश्मिर ६)मोहंमद बिलाल मोहंमद निसार वय ३० वर्षे, मुळ राहणार- गंजापुर, ता. मंजापुर, जि. राजोरी राज्य जम्मू काश्मिर तसेच वर नमूद आरोपीत यांचे राहते घरी गुन्हयाचे अनुषंगाने घरझडती घेतली असता ८ सिंगल बोर रायफल, २८ जिवंत राउंड, तसेच जम्मु कश्मिर येथील राजोरी व अनंतनाग येथील
बनावट लायसन्स सह एकुण रू. ४.५६,२४०/- मुददेमाल हस्तगत करणेत आलेला आहे.
सदर अनुषंगाने आज रोजी पावेतो, हस्तगत करणेत आलेल्या बनावट अग्निशस्त्र लायसन्स बाबत तपास पूर्ण होवून, जम्मू कश्मिर राज्य, जिल्हा मॅजेस्ट्रेट यांचेकडील प्राप्त अहवाला नुसार गुन्हयात हस्तगत करणेत आलेले बनावट लायसन्स व अग्निशस्त्र हे बनावट व बेकायदेशीर असल्याचे निष्पन्न झालेले आहे. सदर अनुषंगाने मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-५, पुणे शहर व मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाउसाहेब पटारे यांचे मार्गदर्शनखाली पुढील तपास पोउपनि संतोष सोनवणे, तपास पथक, वानवडी पोस्टे हे करीत आहेत.
वर नमूद प्रमाणे जम्मू काश्मिर राज्य, जिल्हा मॅजेस्ट्रेट यांचेकडुन बनावट लायसन्स अहवालानंतर माहे ऑक्टोबर २३ रोजी सदर अनुषंगाने बनावट लायसन्स व बेकायदेशीर अग्निशस्त्र चे वापराबाबत तपासात निष्पन्न झालेल्य माहिती आधारे खालील आरोपीत यांना अटक करणेत आलेले आहे. ७) साहिल कुमार चमनलाल शर्मा, वय २५ राहणार •मुळ राहणार राजौरी, जम्मु काश्मिर राज्य. – ८) गीतम देशराय शर्मा, वय २३, राहणार मुळ राहणार तेरीयाथ, राजीरी, जम्मु – काश्मिर राज्य.नमूद आरोपीत क्र.७ व ८ यांचेकडुन ३ बनावट अग्निशस्त्र परवाने २८ जिवंत राउंड, तसेच ४ सिंगल वोर रायफल जप्त करणेत येवून, एकुण रू.१.२६,२५०/- किंमतीचा मुददेमाल जप्त करणेत आलेला आहे. अशा प्रकारे आज रोजी पर्यंत वानवडी पोस्टे गुरनं- ३६९ / २०२३ भादंवि कलम (२५), ४६७,४६८, ४७१ सह १२० ब प्रमाणे दाखल गुन्हयात एकुण ८ वाहय ( उत्तरप्रदेश, जम्मू कश्मिर )राज्यातील तरुणाना बनावट लायसन्स व बेकायदेशीर अग्नीशना सह एकूण रु.६,५१,०००/- चा मुददेमाल वानवडी पोलीस ठाणे तपास पथकाकडुन जेरबंद केलेले आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री संदिप कर्णीक, मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर श्री रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उपआयुक्त परि. ५. पुणे शहर श्री विक्रांत देशमुख व मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर श्री. शाहुराजे साळवे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक भाऊसाहेब पटारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विनय पाटणकर, तपास पथकातील पोलीस उपनिरिक्षक संतोष सोनवणे, पोहवा. हरीदास कदम, संतोष नाईक, अमजद पठाण, अतुल गायकवाड, यतिन भोसले, अमोल गायकवाड, विठठल चोरमले, विष्णु सुतार, निलकंठ राठोड व मपोना / सोनम भगत यांनी मिळुन केली आहे.

