देवेंद्र सिरसाट, हिंगणा (नागपूर) प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- चीन मधील हांगझोऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये तिरंदाजी स्पर्धेत पुरुषांचे वैयक्तिक कंपाऊंड, मिश्र संघ कंपाऊंड व पुरुष संघ कंपाऊंड असे तीन गोल्ड मेडल जिंकून देश, राज्य आणि नागपूर जिल्हाला जगात गौरव मिळवून देणाऱ्या ओजस देवतळे यांचा त्यांच्या मूळ गावी गुमगाव येथे जाऊन संत गमाजी महाराज शिक्षण संस्थे तर्फे संस्थेचे अध्यक्ष तथा राज्याचे माजी मंत्री रमेशचंद्र बंग व जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते दिनेश बंग यांच्या हस्ते शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.
यावेळी संस्थेचे कोषाध्यक्ष महेश बंग, अरुण देवतळे, सरपंच शोभा माहुरे, सरपंच उषा बावणे, प्राचार्य नितीन तुपेकर, प्राचार्य शशिकांत मोहिते यांच्यासह संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.

