निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांचे मार्फत जिल्हाधिकारी यांना भारतीय ब्ल्यू पँथर च्या” वतीने निवेदन.
उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- प्रतिवर्षाप्रमाणे घटस्थापनेपासून विजयादशमी पर्यंत दुर्गा माता दौड निघत असते त्या दुर्गा माता दौडीमध्ये लाठी काठी व नंग्या तलवारी घेऊन जिल्हा मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दौडीचेन नियोजिन केले जाते, त्या सर्व ठिकाणच्या दौडी मधील लाठी काठी व नंग्या तलवारी घेऊन फिरण्यास प्रशासनाकडून कायद्याने प्रतिबंध करणेत यावा दुर्गा माता उत्सवातील दौडीस आमचा विरोध नाही पण दौडीमध्ये लाठी काठी व नंग्या तलवारी घेऊन फिरण्यास आमचा विरोध आहे.
संविधानाच्या कायद्यानुसार शस्त्र बाळगणे हा गुन्हा असून संविधानाचा अवमान आहे. तरी सदरच्या दुर्गा माता दौडीमध्ये लाठी काठी व नंग्या तलवारी घेऊन फिरण्यास प्रतिबंध करणेत यावा. असे निवेदन देण्यात आले यावेळी भारतीय ब्ल्यू पँथरचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नितिन गोंधळे राष्ट्रीय कार्याध्यक्ष धनंजय खांडेकर, कास्टा्ईब संघटनेचे उपाध्यक्ष कृष्णा मासाळ, जेष्ठ कार्यकर्ते कुमार कांबळे, हणमंत शिंदे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348