आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका अल्पवयीन मुलीला कारमध्ये जबरदस्ती ने बसवून दारू पाजत एकाने बळजबरी अत्याचार केल्याची घटना घडली आहे. ही घटना आर्वी तालुक्यातील एका गावात रात्रीच्या सुमारास घडली. ही घटना समोर येताच संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आर्वी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांच्या शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि आर्वी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, आर्वी पाेलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या एका गावातील रहिवासी 17 वर्षीय मुलीला अशपाक आणि शुभम नामक आरोपींनी कारमध्ये जबरदस्तीने बसवलं. तिला गावाबाहेरील रस्त्यावर नेत कारमध्येच बळजबरीने दारु पाजली.
नंतर दोघांपैकी एकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, अशी माहिती मुलीने पोलिसांना दिली.
ही तक्रार प्राप्त होताच पोलीसानी तत्काळ कारवाई सुरू करून दोन्ह आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला. त्यानंतर पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक आणि आर्वी पोलिसांचे एक अशी दोन पथके आरोपींच्या मार्गावर आहेत. लवकरच या आरोपींना अटक करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक काळे यांनी सांगितले.

