अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी मो. नं. – 9822724136
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर 17 ऑक्टोंबर:- सावनेर तालुक्यातील सावंगी ताज आश्रम येथे अँक्सीस सिडस् कंपनी द्वारे आयोजित पीक पाहणी कार्यक्रम शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थित पार पडला. यावेळी युवा व प्रगतशील शेतकरी विनोद कुमार बागडे यांनी आपल्या शेतात पेरलेल्या अँक्सीस सिडस् कंपनीच्या कपाशीचे वान रुस्तम बीजीडी व लिडर बीजीडी च्या प्रत्येक झाडावर जवळपास कपाशीचे 75 ते 80 बोंड तर पात्यांची संख्या 50 ते 60 च्या घरात असल्याने कपाशीचे चांगले उत्पादन होण्याची शक्यता आहे.
ताज आश्रम सावंगी शिवारात असलेले कपाशीचे चांगल्या दर्जाच्या पीकाला पहाण्यासाठी परिसरातील जवळपास पाचशे शेतकऱ्यांनी भेटी देऊन वन भोजनाचा आस्वाद घेतला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष अमोल मोरे (एसडीएम) अँक्सीस सिडस् यांच्या हस्ते युवा प्रगतशील शेतकरी विनोद बागडे यांना शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी श्रीकीशन खंगारे,भरत ठाकुर यांच्या प्रमुख उपस्थितीत दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली तर आयोजनात उपस्थित शेतकरी बांधवांना अमोल मोरे, मुरलीधर टाले, पवन सातपुते, हेमंत भगत आदीनी मार्गदर्शन केले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348

