रविंद्र भदर्गे, जालना उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परतूर:- तालुक्यात काही दिवसांपासून स्वस्त धान्य दुकानात निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप करण्यात येत आहे. याबाबत नागरिकांच्या तक्रारी येत आहे. त्यात सध्या वाटप करण्यात येत असलेला तांदूळ हा अतिशय निकृष्ट दर्जाचे असून, खाण्यास लायक नाही. अशा तक्रारी येत आहे.
परतूर तालुक्यातील आंबा येथील स्वस्त धान्य दुकानात सणासुदीला नवरात्र व दसरा निमित्त खराब धान्याचे वाटप परतूर तालुक्यातील आंबा येथील राशन दुकानांमध्ये तांदूळ हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे आले असून असे निकृष्ट दर्जाचे तांदूळ जे की जनावराला सुद्धा खायला घालू नये इतके खराब आहे असे तांदूळ हे राशन दुकानदार गोरगरीब जन जनतेला वाटप करताना दिसून येत आहेत त्यांच्याकडे तक्रार घेऊन गेले असता दुकानदार ने सांगितले की पूर्ण परतुर तालुक्यात अशाच प्रकारचा तांदूळ आलेला आहे त्याला आम्ही काही करू शकत नाही जो तांदूळ शासनाने दिला आहे तो वाटप आम्ही करत आहोत.
अशा प्रकारचे उत्तर सदरील दुकानदार यांनी दिले आहे तरी तहसीलदार साहेबांनी या सर्व परतूर तालुक्यातील दुकानातील निकृष्ट दर्जाच्या तांदळाची योग्य ती चौकशी करून परतुर तालुक्यात आलेला खराब तांदूळ वितरण करण्यापासून रोखला पाहिजे अशी जनतेतून मागणी होत आहे