पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो 7020794626
पोलीस स्टेशन भारती विद्यापीठ पोलीस ठाणे पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हददीत भिलारवाडी कात्रज घाटातील वळणाजवळ चामुंडाभवानी माता मंदीर असून सदर मंदीरामध्ये दिनांक २२/०८/२०२३ रोजी २१/०० वा ते २३/०८/२०२३ रोजी सकाळी ०६/०० वा चे दरम्यान आरोपीने ०२,६०,०००/- रु किमतीच्या देवीच्या दागिन्याची चोरी केली होती त्यांनंतर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे रोशन ऋषीराज दाहाल वय-३३ वर्षे धंदा-पुजारी रा. चामुंडा भवानीमाता मंदीराचे मागे राज टावर, सी-विंग, भिलारेवाडी भारत पेट्रोलपंपासमोर कात्रज पुणे यांनी दिल्या फिर्यादवरुन ५३९/२०२३ भादंवि कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाच्या तपासामध्ये भारती विद्यापीठ गुन्हे शोध पथकाने मंदीरातील सी सी टी व्ही फुटेजची पाहणी केली असता सदर आरोपी घटनेच्य दिवशी रात्री तोंडास कपडा गुंडाळून मंदीराचे दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करताना आढळला त्याने मंदीरामध्ये प्रवेश केल्या केल्या देवीला झोपून सांष्टांग दंडवत घालून सदर मंदीरातील देवीच्या दागिन्याची चोरी करुन साथीदारासह (गोपनीय ) पसार झाला त्यांनतर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकातील महेश बारावकर, निलेश ढमढेरे, चेतन गोरे यांनी आरोपीच्या मंदीरातील हालचाली व सी सी टी व्ही फुटेज तसेच गुप्त बातमीदार, तांत्रीक विश्लेषनाच्या मदतीने आरोपी नामे सुनिल आण्णा कांबळे, वय ३६ वर्षे, धंदा मंडप बांधणे, रा. रामनगर, बापुजी बुवा चौक, पिठाच्या गिरणीजवळ, वारजे, पुणे यास अटक केली असता त्याने गुन्हयाची कबुली दिली असून सदर गुन्हा त्याने त्याचा साथीदाराचे मदतीने केला असल्याचे निष्पन्न झाले असून आरोपीकडून देवीचे चोरीस गेलेले एक चांदीचा कासव, चांदीचे पादुका, चांदीची घंटी एक चांदीची चामुंडा माताची मोठी व लहान टाग, चांदीचे नारळाचे तोरण, पिवळया धातुचे दागिने, पांढ-या धातुची कुत्रिम छत्री असे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत सदर अटक आरोपी याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्याचेवर ५० पेक्षा अधिक घर फोडी व चोरीचे तसेच डबल मर्डरचा गुन्हा दाखल असून सदर मर्डरच्या गुन्हयामध्ये सन २०१८ पासून जेलमध्ये होता आता तो मार्च २०२३ मध्ये जामीनावर बाहेर आला आहे तरी प्रमुख गुन्हयांची माहीती खालील प्रमाणे आहेत.
सदर गुन्हयाच्या तपासामध्ये मा. रितेश कुमार साो. पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. संदीप कर्णीक सो सह-आयुक्त पुणे शहर, मा. प्रवीणकुमार पाटील, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे शहर यांचे मार्गदशनाखाली मा. स्मार्तना पाटील सो, पोलीस उप आयुक्त सो परिमंडळ ०२ पुणे शहर. मा. नारायण शिरगावकर, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली मा विनायक गायकवाड सो. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारती विद्यापीठ पो स्टे, मा. विजय पुराणीक, पोलीस निरीक्षक गुन्हे भारती विद्यापीठ पो स्टे मा गिरीश दिघावकर सो, पोलीस निरीक्षक (गुन्हे). सपोनि अमोल रसाळ, पोउनि धीरज गुप्ता, अंमलदार शैलेंद्र साठे, चेतन गोरे, महेश बारावकर, मंगेश पवार निलेश खैरमोडे, अवधूत जमदाडे, निलेश ढमढेरे, सचिन सरपाळे, अशिष गायकवाड, राहूल तांबे, हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे, मितेश चोरमले, अभि चौधरी, अभि जाधव, विक्रम सावंत यांचे पथकाने केलेली आहे.