पत्रकारांनी निष्पक्ष शहानिशाह करून बाजू मांडावी राष्ट्रीय मानवधिकारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष किशोर शंभरकर यांचे हस्ते उदघाटन
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे गोंडवाना शक्ती न्युजचे उद्घघाटन किशोर शंभरकर जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटन यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले.
गोंडवाना शक्ती न्युज पोर्टलचा उद्घाटन सोहळा अहेरी शहरात आज दिनांक २४ऑक्टोंबर रोजी दसहरा मुहूर्तावर आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी गोंडवाना शक्ती न्युज पोर्टलचा उद्घाटन सोहळा किशोर शंभरकर जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटन यांच्या हस्ते पार पडला, या वेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, लोकशाहीच्या बळकटित प्रसार माध्यमांनी मोलाचा सहभाग नोंदविला आहे. त्यामुळे प्रसार माध्यमांनी निष्पक्ष पणे सत्याची कास धरून बाजू मांडावी. आजू बाजूला घडत असलेल्या वाईट चांगल्या गोष्टी सगळ्या समोर मांडण्याची ताकद फक्त पत्रकारांच्या लेखणीत असते. देशाच्या स्वांतत्र्यलढ्यात वृत्तपत्राचा सिंहाचा वाटा होता.आज काल काही प्रमाणात पेड न्यूज दिली जाते,त्या गोष्टी मुळे काही प्रमाणात विश्वासहर्ता कमी होत आहे.या पलीकडे जाऊन सत्याची भूमिका घेतली पाहिजे, असे उदगार त्यांनी काढले.
यावेळी गोंडवाना शक्ती न्युज पोर्टलचे संपादक किशोर उसेंडी, उपसंपादक भास्कर फरकडे यांना शुभेच्छा देताना जावेद अली, विदर्भ अध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटन यांनी प्रसार माध्यमांनी डोळ्यावर पट्टी बांधून पत्रकारिता नाकारता उघड्या डोळ्यांनी बाजू मांडावी असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी तालुका अध्यक्ष राजेंद्र चिमरालवार, तालुका उपाध्यक्ष प्रशांत जोशी तसेच मल्लयाजी दुर्गे या मान्यवरांनी गोंडवाना शक्ती न्युज पोर्टलचे संपादक किशोर उसेंडी, उपसंपादक भास्कर फरकडे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

