Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

हिंगणघाट येथे भुलाबाईच्या गाण्यांची स्पर्थेला उस्फूर्त प्रतिसाद, १५ समुहांचा सहभाग.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 6, 2023
in Uncategorized, महत्त्वाच्या बातम्या, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट येथे भुलाबाईच्या गाण्यांची स्पर्थेला उस्फूर्त प्रतिसाद, १५ समुहांचा सहभाग.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज !ऑनलाईन हिंगणघाट:- कोजागिरी पौर्णिमेनिमित्त घरोघरी मुली व स्त्रिया भुलाबाईचे खेळ खेळून पारंपारिक गाणी म्हणत असतात. आधुनिक काळात या कला नष्ट होत चालल्या आहे. नव्या पिढीला त्याची जाण व्हावी आणि या सण, परंपरा व कला पुढेही जोपासल्या जाव्यात या अनुषंगाने समर्था इव्हेंट्स अँड सिने प्रोडक्शन एलएलपीद्वारा आयोजित भुलाबाईच्या गाण्यांची स्पर्धा ४ नोव्हेंबर, शनिवार रोजी संत कवरराम भवन, सिंधी कॉलनी हिंगणघाट येथे उत्साहात पार पडली.

या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी हिंगणघाट तालुका उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, समर्था इव्हेंट्स अँड सिने प्रोडक्शनचे संचालक श्रुती दुधलकर सोरटे व राहुल सोरटे, सिल्वर इनिंगस जेष्ठ नागरिक महिला मंडळ च्या अध्यक्षा डॉ. सुरेखा देशमुख, आधार फाउंडेशनचे अध्यक्ष अतुल वांदिले, माजी नगरसेवक मनीष देवडे, साजापूरकर मॅडम, समर्था इवेंट्स अँड सिने प्रॉडक्शन एल एल पी च्या मार्गदर्शक शकुंतला दुधलकर, पत्रकार संघ हिंगणघाट चे अध्यक्ष किरण वैद्य, विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच सदर स्पर्धेचे परीक्षक म्हणून संगीत शिक्षक विजय गावंडे, सेवानिवृत्त प्रा. डॉ. सिद्धार्थ बुटले आणि प्रा. डॉ. माया रंभाळे पराते यांची उपस्थिती होती.

या स्पर्धेत सर्व वयोगटातील मुली व स्त्रियांच्या १५ समूहांनी सहभाग घेतला. स्पर्धेत वेगवेगळी पारंपरिक भुलाबाईची गाणी तसेच काही नव्याने लिहिलेली आधुनिक भुलाबाईंच्या गाण्यांचे सादरीकरण व विविध पारंपारिक खेळ स्पर्धकांनी सादर केले. प्रथम पारितोषिक रोख ३००१/-, मानचिन्ह व भेटवस्तू शिवकन्या ग्रुप, द्वितीय पारितोषिक रोख २००१/- व भेटवस्तू सपना बेले व स्नेहल बेले, तृतीय पारितोषिक रोख १००१/- व भेटवस्तू मा जगदंबा ग्रुप, प्रथम प्रोत्साहनपर पुरस्कार रोख ५०१/- व भेटवस्तू वेणु निमजे ग्रुप तसेच द्वितीय प्रोत्साहनपर पुरस्कार रोख ३०१/- व भेटवस्तू शिवशक्ती ग्रुप या ग्रुपला देऊन विजेत्यांचे अभिनंदन करण्यात आले. सहभागी सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देण्यात आल्या.
या वेळी समर्था राहुल सोरटे या आठ वर्षाच्या चिमूकलीने पारंपरिक ‘ अडकित जाऊ, खिडकीत जाऊ ‘ या भुलाबाईच्या गाण्याच्या चालीवर मतदान आणि नवमतदार नोंदणी चे महत्व आपल्या गाण्याच्या माध्यमातून सांगत विशेष प्रस्तुती दिली. तसेस माऊली प्रवीण कडू या चिमूकलीने पारंपरिक भुलाबाईचे गाणे सादर केले.

सदर स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी स्थळ प्रायोजक माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, भेटवस्तू प्रायोजक ओम गौरव हायगिन प्रोडक्टस अँड बी-विथ-मी चे संचालक पितांबर चंदानी, छायाचित्र प्रायोजक दुधलकर स्टुडिओ चे संचालक मनोज दुधलकर, आदरातिथ्य व अल्पोपहार प्रायोजक सिल्वर इनिंगस जेष्ठ नागरिक महिला मंडळ, प्रथम पारितोषिक प्रायोजक अतुल वांदिले, द्वितीय पारितोषिक प्रायोजक स्नेहल किसान नर्सरी, तृतीय पारितोषिक प्रायोजक मनीष देवडे, प्रथम प्रोत्साहनपर पुरस्कार प्रायोजक माजी नगरसेविका शुभांगी डोंगरे, द्वितीय प्रोत्साहनपर पुरस्कार प्रायोजक शकुंतला दुधलकर, यांचे विशेष सहयोग लाभले.

तसेच या कार्यक्रमात निसर्गसाथी फाऊंडेशन हिंगणघाट चे अध्यक्ष प्रवीण कडू, सेवा निवृत्त प्राध्यापिका विनया भूपेंद्र शहाणे, पी. वी. टेक्सटाइल च्या असिस्टेंट मॅनेजर अँड लेडी कौंसेलर अर्चना झालटे, मिसेस. महाराष्ट्र २०२३ सेकंड रनरअप रागिणी मून, यांची विशेष उपस्थिती लाभली.

या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात स्नेहल किसान नर्सरीच्या विद्या खांडरे, शकुंतला दुधलकर, स्पर्धेचे परीक्षक विजय गावंडे, डॉ. सिद्धार्थ बुटले आणि डॉ. माया रंभाळे पराते यांची उपस्थिती होती. संचालन, प्रास्ताविक व आभार प्रदर्शन श्रुती दुधलकर सोरटे यांनी केले. आयोजन कार्यक्रम-समन्वयक मयुरी गौळकार, ईशा लोणकर आणि समर्था सोरटे यांनी केले. यशस्वीतेसाठी प्रकाश भलमे, दीक्षा मून, श्रद्धा चिणचुलकर आणि समर्था इव्हेंट्स अँड सिने प्रोडक्शनच्या चमुने सहकार्य केले.

Previous Post

आदित्य कृषी महाविद्यालयाचा अटकेपार झेंडा, बिहार कृषी महाविद्यालयात ‘आदित्य’च्या विद्यार्थ्याची सहाय्यक प्राधापक म्हणून निवड.

Next Post

जलचर आधारित उपजीविकेच्या संधी” या विषयावर जलजीविका संस्थेची कार्यशाळा संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
जलचर आधारित उपजीविकेच्या संधी” या विषयावर जलजीविका संस्थेची कार्यशाळा संपन्न.

जलचर आधारित उपजीविकेच्या संधी” या विषयावर जलजीविका संस्थेची कार्यशाळा संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In