मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- वर्धा जिल्ह्याकरीता राज्य सरकार द्वारा घोषित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट शहर मध्ये होण्याकरीता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महीलांकृती समितीचा मागील अनेक दिवसापासून संघर्ष सुरूच आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आयोजित धरने आंदोलनाचा परवा १६२ वा दिवस शासकीय वैद्यकिय महाविद्यालय महिला कृती समितीने हिरीरीने भाग घेऊन जोरदार आंदोलन केले.
मेडिकल कॉलेज करीता महिलांद्वारे ठरल्याप्रमाणे रविवारी सृजनशील पद्धतीने डॉ.आंबेडकर चौक येथे आंदोलन करण्यात येते. ह्या रविवारी महिलांनी केसांना काळ्या क्लिप लाऊन १६२ वा दिवशी जोरदार आंदोलन केले. आता पर्यन्त विविध घटकांनी शहरात शासकीय मेडिकल कॉलेज यावे ह्यासाठी प्रयत्न केले गेले आहेत. त्यामधे प्रामुख्याने विरोधी पक्ष नेते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व हिंगणघाट विधानसभेचे आमदार समिर कुणावर ह्यांनी विधान सभेत हिंगणघाट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट मध्ये जनतेची मागणी आहे ह्या संबंधी प्रश्नावर प्रतिउत्तरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी समिती स्थापित करून कॉलेजचे ठिकाण निश्चित करण्यात येणार असल्याचे संगितले होते. त्याच मुद्द्यावर येऊन ठेपले आहे आणि पुढील वाटचाल कळायला मार्ग मुळात नाही आहे.
त्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ ह्यांची भेट आणि त्यांचे कॅबिनेट बैठकीत बसून मागणी मान्य करून घेण्याचे आश्वासन अशा इतर वेगवेगळ्या घटना शासकीय वैद्यकिय महाविद्यालय हिंगणघाट मध्ये होण्यास अनुकूलच घडल्या. अशा रीतीने कॉलेज हिंगणघाट येथे येण्यासाठी विविध प्रयत्न सुरूच आहेत. त्यामधे श्याम इडपवार ह्यांचे अन्नत्याग सत्याग्रह उपजिल्हाधिकारी ह्यांच्या आश्वासन मिळाल्यावर मागे घेण्यात आले होते.
महिला कृती समितीच्या आंदोलकांनी आंदोलन समितीचा पुढील निर्णय मिळवण्यासाठी सतत तसेच पुढे रेटायचे ठरवले आहे. त्याप्रमाणे त्यानुसार काल १६२ व्यां दिवशी महिलांनी केसांना काळ्या क्लिप लाऊन प्रशासन आणि स्थानिक लोक प्रतिनिधीं ह्यांचा निषेध केला. वैद्यकीय महविद्यालय हिंगणघाट मध्ये येण्यास सर्व नेमलेल्या समितीची सुनियोजित कृती करण्यास पाठपुरावा सरकार, प्रतिनिधी आणि गठित समिती ह्यांनी करावा अन्यथा आंदोलन असे चालूच राहील असा इशारा शासकीय वैद्यकीय महविद्यालय महीला कृती समितीच्या वातीनी देण्यात आला.
यामध्ये प्रामुख्याने सावित्रीच्या लेकी ह्या संस्थेच्या सदस्या उपस्थीत होत्या.