मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन दि 07:- रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांच्या पथकाला मुखबीर कडुन खाञीशीर खबर मिळाली की संत तुकडोजी वॉर्ड हिंगणघाट येथे राहणारा प्रतीक सोनटक्के हा त्याचे गोल्डन रंगाच्या स्विफ्ट डिझायर चार चाकी कार क्रमांक MH 47 AN 3240 ने विनापास परवाना देशी दारूची अवैध वाहतूक करून जाम कडून हिंगणघाट कडे येत आहे अशा माहितीवरून रोशन पंडित उप विभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांचे आदेशाने पोलीस स्टाफ पीसआय प्रेमराज अवचट पोलीस आमदार अश्विन सुखदेवे, स्वप्निल जीवने, समीर कुरेशी व पंच यांचेसह आरोपी प्रतीक सुनीलराव सोनटक्के वय 24 वर्ष राहणार संत तुकडोजी वॉर्ड हिंगणघाट याचेवर नाकेबंदी करून प्रो रेड केला.
यावेळी आरोपी प्रतीक सोनटक्के हा त्याचे गोल्डन रंगाच्या स्विफ्ट डिझायर चार चाकी कार क्रमांक MH 47AN3240 ने विनापास परवाना देशी दारूची अवैध वाहतूक करताना मिळून आल्याने आरोपीच्या तब्यामधून 90 एम एल च्यादेशी दारूने भरुन असलेल्या एकूण 26 खर्ड्याचे खोक्यात प्लास्टीकच्या एकूण 2600 शिश्या प्रति शिशी 100 रू प्रमाणे 260000/रू व कार कि 6,00,000/रू व एक स्मार्ट फोन की 5000/रू असा एकुण 8,65,000/रू चा माल मिळुन आल्याने जागीच सविस्तर मौक्का जप्ती पंचनामा कारवाई करून पोलीस स्टेशन मध्ये परत येवुन आरोपीविरूध्द दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक नरूल हसन, अप्पर पोलीस अधिक्षक सागर कवडे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट रोशन पंडित यांचे निर्देशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांचे पथकतील पीएसआय प्रेमराज अवचट सा.पोलीस आमदार अश्विन सुखदेवे, स्वप्निल जीवने समीर कुरेशी यांनी केली.