प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबाईल :- 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन समुद्रपुर दि. 07:- रोजी समुद्रपूर पोलीस स्टेशनच्या डी बी पथकाने मौजा गणेशपूर शिवारात प्रो रेड कारवाई केली असता आरोपी नामे राकेश बंडू राठोड व तेजस राजू कांबळे दोन्ही रा. हिंगणघाट हे एका हिरो होंडा झेडएमआर मोटर सायकल वरून 10 प्लास्टिक ब्लडर मध्ये मोहा दारूच्या मालाची वाहतूक करताना रंगेहाथ मिळून आले त्यांचे ताब्यातून एक मोटर सायकल व 150 लिटर मोहा दारू असा जु कीं 97,000 रु चा माल जप्त करण्यात आला.
आरोपितांनी सदर मोहा दारूचा माल गणेशपूर पारधी बेडा येथे राहणारा दिनेश पवार यांचे कडून घेतल्याचे निष्पन्न झाल्याने सदर तिन्ही आरोपी विरुद्ध समुद्रपूर पोलीस स्टेशन येथे अप क्रमांक 809/22 कलम 65 (इ) (अ) 83 म दा का सहकलम 3 (1) 181 130/177 मो वा का अन्वये कारवाई करण्यात आली.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नुरूल हसन, अपर पोलीस अधीक्षक डॉ सागर कवडे, उप विभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांचे मार्गदर्शनात समुद्रपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार एस बी शेगावकर यांचे निर्देशाप्रमाणे डी बी पथकाचे अरविंद येनूरकर, रवी पुरोहित, राजेश शेंडे, सचिन भारशंकर, वैभव चरडे यांनी केली.