बुद्ध विहार कमेटीचे अध्यक्ष प्रलंय तेलंग सह नागरिकांची रामनगर वॉर्डातील कचरा डेपोला तात्काळ हटवा निवेदनाद्वारे केली मागणी.
प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबाईल :- 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट :- सम्यक बुद्ध विहार प्रबुद्ध नगर च्या मागच्या बाजूस नगर परिषद हिंगणघाट द्वारा कचरा डेपोच्या अड्डा तयार करण्यात आला आहे. त्याला लागूनच नूतन शाळा व पाण्याची टाकी आहे. कचरा डेपोमुळे मोठ्या प्रमाणात घाण व दुर्गंधीमुळे नागरिकांचे राहणे कठीण झाले आहे. त्यामुळे नागरिकांचा आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. अनेक वेळा निवेदने देऊन हि तो कचरा डेपो हटविण्यात आला नाही. दहा दिवसांच्या आत कचरा डेपो हटविन्यात आला नाही तर तो संपूर्ण कचरा नगरपरिषद मध्ये आणून टाकू असे निवेदने सम्यक बुद्ध विहार कमेटीचे अध्यक्ष प्रलंय तेलंग यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे.
यावेळी सम्यक बुद्ध विहार कमेटीचे अध्यक्ष प्रलंय तेलंग यांच्यासह शाहरूख बक्ष, अमित झांबरे, वज्रपाल बोधिले, अमरदीप बन्सोड, बालू बरहते, संजय बरहते, सुदुल इतकं, सक्षम खेडकर, कविता मानकर, मनिषा खेडकर, आम्रपाली भालशंकर, सविता झिलते, बबिता ढेपे, निर्मला भोंगाडे, पायल उईके, लक्ष्मीबाई वानकर, रेखा इंदूरकर, अन्नपूर्णा बन्सोड, भारती झांबरे, चंद्रकल उमरे, अश्विनी पाटील, आदी सदस्य व वॉर्डातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348