अक्षय अरुण म्हात्रे, पेण तालुका प्रतिनिधी
7276222387
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पेण:- जे एस डब्लु अस्पायर मॅजिक बस फाउंडेशन तर्फे गेली चार वर्ष पेण तालुक्यातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना जीवनकौशल्य व पायाभूत अभ्यासक्रमाचे ज्ञान दिले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून गो. ना. म्हात्रे माध्यमिक शाळा, भाल येथे बालपांचायतिची स्थापना करण्यात आली.
येथील बालपंचायत पदाधिकाऱ्यानी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या मिटींग मध्ये आरोग्याच्या दुष्टीने विद्यार्थ्यांना काही काम करता येईल का ह्या वरती शाळेबरोबर चर्चा केली आणि बालपंचायतिच्या मदतीने किमान विद्यार्थ्यांची रक्त गट तपासणी या शिबीराचे आयोजन करण्यासाठी मुख्याध्यापक सौं मीनल रणदिवे यांनी मान्य केले. त्यानुसार बालपंचायतीने संपूर्ण जबाबदारी घेऊन शिबिरासाठी जागेची मांडणी, तपासणी साठी आलेल्या डॉकटर व अधिकाऱ्यांचे स्वागत, नावनोदंणी, मुलांना तपासणीसाठी रांगेत घेऊन येणे अशी सर्व कामे प्रामाणिकपणे व आनंदाने केली.
या संपुर्ण कार्यक्रमाचं नियोजन बालपंचायतिने उत्तम रित्या केल्यामुळे मुख्याध्यापक, शिक्षक व पालकांतर्फे सर्व सदस्याचे कौतुक केल गेले.
जे एस डब्लू अस्पायर मॅजिक बस फाउंडेशन प्रकल्पकडून राबविळ्या जाणाऱ्या या प्रकल्पतील उत्तम व युनिक गोष्टींमुळेच विद्यार्थ्यामध्ये हा बदल झालेला आहे. अशा प्रकारे आपण विद्यार्थी आणी पालक या दोन्हीही गटामध्ये आरोग्यविषयक जागृती आणी जबाबदारीने निर्माण असे प्रतिपादन मुख्याध्यापिका मीनल मॅडम यांनी केले व या स्तुत्य उपक्रमासाठी शुभेच्छा देऊन पुढील. कार्यक्रमाचे आयोजन केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निखिल गावंड, स्वाती पाटील, सुचिता पाटील, क्लास्टर मॅनेजर डॉ. प्रगती पाटील यांनी विशेष मेहनत घेतली.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348