मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध गायक इंडियन आयडल फेम अमेय दाते यांचा हिंगणघाट येथे दिनांक १२ नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या पावन पर्वावर मराठी आणि हिंदी भाव व भक्ती गीतांचा बहारदार कार्यक्रम’ दिवाळी पहाट ‘चे आयोजन आमदार समीर कुणावर व मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले होते. दिनांक १२ रोजी पहाटे ५.३० वाजेपासून स्थानिक राम मंदिर चौकात मराठी व हिंदी भाव व भक्ती गीतांचा बहारदार कार्यक्रम रंगला.
सदर कार्यक्रमात महाराष्ट्राचा नामवंत गायक व इंडियन आयडल फेम अमेय दाते याने हिंदी व मराठी विविध गीतांचे सादरीकरण केले . सुप्रसिद्ध तबलावादक सचिन ढोमणे यांची साथ संगत लाभली . सुप्रसिद्ध पार्श्वगायिका सुरभी ढोमणे आणि सुप्रसिद्ध गायक मंगेश पुणेकर मुंबई यांनी गायलेल्या सुरेल गीतांनी श्रोत्यांना मंत्र मुग्ध केले.
दिवाळीच्या पावन पर्वावर हिंगणघाट शहरात प्रथमच हिंगणघाटवासीयांसाठी ही खास पर्वनी लाभली. खासकरून सांस्कृतिक वारसा असलेल्या हिंगणघाट शहरातील संगीत प्रेमींसाठी ही मेजवानीच ठरली . यावेळी आमदार समीर कुणावार यांनी कन्या शाळेजवळील चौकाचे नामकरण श्री राम मंदिर चौक करणार असल्याचे जाहीर केले. तसेच दरवर्षी दिवाळीला ‘ दिवाळी पहाट’ कार्यक्रमाचे आयोजन करणार असल्याचे सांगून श्रोत्यांचे आभार मानले. कार्यक्रमाला संगीत प्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.