पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- एकदा संशय मनात शिरला की मनातले विचार अकारण किती पराकोटीला जाऊ शकतात, सुहास, हा निरर्थक संशय कल्लोळमुळे क्षुल्लक बाबींमुळे तुमच्या चांगल्या सुखी संसाराची राखरांगोळी होण्याची शक्यता आहे. अशीच एक खळबळजनक घटना पुण्यातून समोर आली आहे.
आपल्याच पत्नीची चारित्र्यावर संशय घेत एक इसमाने त्याच्या पत्नीला औषधांच्या गोळ्यांमधून ब्लेडचे तुकडे गिळायला लावण्याची अत्यंत क्रूर घटना समोर आली आहे. पुण्यातील उत्तमनगर मध्ये हा प्रकार घडला असून 41 वर्षीय पीडित महिलेने यासंदर्भात उत्तमनगर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी नराधम पतीच्या विरोधात गुन्हा दाखल करून हे अमानुष कृत्य करणाऱ्या सोमनाथ सपकाळ वय 45 याला अटक केली.
प्राप्त माहितीनुसार, हा काळीमा फासणारी प्रकार ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होता. गेल्या दोन महिन्यांपासून सपकाळ दाम्पत्यामध्ये अनेक वाद-विवाद सुरू होते. सोमनाथ हा अनेक वेळा त्याच्या पत्नीवर संशय घ्यायचा. त्याच मुद्यावरून त्यांच्यात अनेक वाद व्हायचे. रागाच्या भरात सोमनाथ हा त्याच्या पत्नीला शिवीगाळ करायचा, एवढेच नव्हे तर त्याने तिच्यावर हात उचलत मारहाणही केली होती. काही दिवसांपूर्चवी सोमनाथ आणि त्याचा भाऊ, घरात दारू पीत बसले होते. तेव्हाही सोमनाथ या मुद्यावरू त्याच्या पत्नीशी भांडला होता.
पत्नीची हत्या करण्याचा कट..
संशयाचा भूत मानगुटीवर शिरलेल्या सोमनाथने संतापात त्याच्या पत्नीची हत्या करण्याचा कट रचला. त्यासाठी त्याने प्लानिंगही केले. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोमनाथने त्याच्या पत्नीला कॅल्शिअमच्या कॅप्सूल्स खाण्यासाठी दिल्या, मात्र त्याआधी त्या कॅप्सूल्समध्ये ब्लेडचे तुकडे टाकले. आणि त्याच गोळ्या तिला खायला दिल्या. तोंडात ब्लेडचे तुकडे तिला टोचू लागले, धारदार तुकड्यामुळे रक्तही येऊ लागले, त्यामुळे त्याच्या पत्नीने त्या गोळ्या, आणि तुकडे थुंकून टाकण्याचा प्रयत्न केला.
पण क्रूर सोमनाथने तिचे काहीच न ऐकता तिला ते तुकडे तसेच गिळायला लावले. त्यामध्ये पीडित महिलेच्या गळ्यात गंभीर जखमाही झाल्या. त्यांनी वैद्यकीय तपासणी केली आणि हा सगळा प्रकार समोर आला. अखेक पीडित महिलेने नराधाम पतीविरोधात तक्रार दाखल केली आणि उत्तमनगर पोलिसांनी आरोपी सोमनथ याला अटक करत तुरूंगात टाकले. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.