आकाश पांचाळ पुणे शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- शहरातील वाकड येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. वाकड मधील अटलांटा सोसायटी जवळ असलेल्या आर्या चायनीज सेंटर येथे एका प्रेमीकेने आपल्या प्रियकरावर पुण्यात प्रेमीकेने आपल्या प्रियकरावर कोयत्याने वार करत केला खुनी हल्ला. वार करत खुनी हल्ला केला. ही घटना सोमवारी दि. 13 रोजी दुपारी 3.00 वाजताच्या सुमारास घडली. संजय नारायण जाधव वय 45, रा. श्रीधरनगर, चिंचवड असे जखमी प्रियकराचे नाव आहे. त्यांनी हिंजवडी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्यांच्या प्रेमिका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार संजय नारायण जाधव आणि त्यांची प्रेमीका हे दोघेही आर्या चायनीज सेंटर येथे राहण्यास आहेत. यातील प्रेमिका हिने फिर्यादी संजय जाधव यांना हॉटेल मधून राहत्या घरी जाण्यास सांगितले. मात्र संजय यांनी हॉटेलमधून जाण्यास नकार दिला. याचा राग प्रेमिकेला आला. त्यावरून त्यांच्यात वादावादी झाली.
त्यानंतर आरोपी प्रेमिकेने चिडून रागाच्या भरात कोयत्याने संजय यांच्या डोक्यात, डाव्या हातावर, छातीवर वार करून गंभीर जखमी केले. या घटनेचा पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.