मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील हरिभाई अरूनभाई डाह्याभाई चंदाराणा परिवार द्वारे महाप्रसाद चे आयोजन करण्यात आले आहे. स्थानीय शितला माता जवळील दानी महाराजांचे मंदिरात जलाराम महाराजांच्या मूर्तीची स्थापने ला ५१ वर्ष होत आहे. या प्रसंगी त्यांचे जयंती पित्यर्थ महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी भजन कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या देवळात संत महाराजच्या मूर्ती स्थापनेला ५१ वर्ष पूर्ण होत आहे. ५१ वर्षा पूर्वी नरसीभाई माधवजी चंदाराणा यांच्या हस्ते सन १९७३ ला मूर्ती स्थापना झाली होती. त्या वर्षा पासून महाप्रसादाचा कार्यक्रम दरवर्षी घेण्यात येतो.
या कार्यक्रम करिता मनोज, जयेश, राकेश, तपेश, नितीन, संजय इत्यादिचे सहकार्य लाभत आहे. या वर्षी 19 नोव्होबरला दुपारी 12 वाजत पासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसादाचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे.

