मुंबई शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- नालासोपारा येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथे एका नराधम बापाने आपल्याच आजारी मुलीला आपल्या हवस ची शिकार बनवले. बापलेकीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना नालासोपारा शहरातून समोर आली आहे.
येथे एका नराधम बापाने आपल्याच 22 वर्षीय आजारी मुलीला घरात डांबून तिला मारहाण करत अश्लील चित्रफीत दाखवून अत्याचार केला. त्यात तो गर्भवती पण झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
पीडित मुलीचा मृत्यू…
22 वर्षीय पीडित मुलगी क्षयरोगाने आजारी होती. तरी या नराधम आरोपीं बापाने तिच्यावर अत्याचार सुरू होते. उपचार सुरू असलेल्या मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या आईने धाडस करून पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे घटना…
पीडित तरुणी नालासोपारा येथे राहत होती. मागील 3 महिन्यांपासून ती क्षयरोगाने आजारी होती. तिला 11 नोव्हेंबर रोजी मुंबईच्या जे.जे. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते; परंतु उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.
पिढीत मुलगी झाली गर्भवती..
नराधम बाप या अत्याचाराची कुठे वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी तो देत होता. मुलीला तो बळजबरीने घरात डांबून ठेवत होता. त्यामुळे पीडित आणि तिची आई भीतीपोटी गप्प राहत होते. हे प्रकार सातत्याने वाढत होते. या काळात मुलगी गर्भवती झाली होती. त्यावेळी तिचा आरोपी पित्याने बळजबरीने तिचा गर्भपातही केला होता. पीडित मुलीचा मृत्यू हा क्षयरोगाने झाला असल्याची माहिती रुग्णालयाकडून मिळाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक याच्या मार्गदर्शन खाली सुरू आहे.