महाराष्ट्र संदेश न्युज प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विश्वचषकाचा अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यासाठी दोन्ही संघ आपल्या पूर्ण तयारीने उतरले आहे. त्यात ऑस्ट्रेलिया संघाने स्टॉस जिंकून भारताला पहिले फलंदाजी साठी निमंत्रण दिले आहे. त्यात भारताने 240 धावा काढल्या आहे. पण या अंतीम सामना सुरू असताना एक महत्वपूर्ण चर्चा सुद्धा समाज माध्यमांवर आकडेवारीनुसार सुरु झाली आहे.
भारतीय क्रिकेट संघ जेव्हा-जेव्हा क्रिकेट वर्ल्डमध्ये फायनलमध्ये पोहोचते, तेव्हा-तेव्हा देशातील विद्यमान पंतप्रधानांची पुढील लोकसभा निवडणुकीत खुर्ची जाते हा इतिहास आहे. डॉ. मनमोहन सिंग यांचा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ हा 10 वर्षाचा होता. त्या दरम्यान, म्हणजे 2003 नंतर भारतीय क्रिकेट टीम फायनलमध्ये पोहिचली नाही. तर 2019 मध्ये तेच झालं आणि मोदी पुन्हा पंतप्रधान झाले होते. आता 2023 क्रिकेट वर्ल्डमध्ये फायनलमध्ये भारतीय संघ फायनलमध्ये पोहिचला आहे आणि 2024 मध्ये लोकसभा निवडणुका आहेत.
आता बघुया आकडेवारी..
1983 विश्वकप – भारतीय संघ फायनलमध्ये पोहोचला आणि वर्ल्ड कप सुद्धा जिंकला – इंदिरा गांधी यांची पुढच्या निवडणुकीत पंतप्रधान पदाची खुर्ची गेली
2003 विश्वकप – भारतीय संघ फायनलमध्ये पोहोचला आणि वर्ल्ड कप फायनलमध्ये पराभव झाला – अटल बिहारी वाजपेयी यांची पुढच्या निवडणुकीत पंतप्रधान पदाची खुर्ची गेली
2011 विश्वकप – भारतीय संघ फायनलमध्ये पोहोचला आणि वर्ल्ड कप सुद्धा जिंकला – डॉ. मनमोहन सिंग यांची पुढच्या निवडणुकीत पंतप्रधान पदाची खुर्ची गेली
2023 विश्वकप – परत एकदा भारतीय संघ फायनलमध्ये पोहोचला आहे. वर्ल्ड कप जिंकावा ही सर्व देशवासीयांची आशा, पण भाजपचा 2024 मध्ये पराभव होऊन विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान पदाची खुर्ची जाणार याची चर्चा सुद्धा समाज माध्यमांवर सुरु झाली आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348