श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अंबड:- मी दोन वर्षे तुरुंगात बेसन भाकर खाल्ली, दिवाळीत सुद्धा खातो पण स्वकष्टाचं खातो तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही असा घणाघात करत मंत्री छगन भुजबळ यांनी अंबड येथील ओबीसी मेळाव्यात एल्गार केला.यावेळी भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासह राज्य सरकार, पोलीस यांच्यावरही प्रश्न उपस्थित केले.
जालना जिल्ह्यातील अंबड येथे छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत ओबीसी समाजाचा एल्गार मेळावा घेण्यात आला.यावेळी भुजबळ यांनी राज्य सरकार, गृह विभाग,पोलीस आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली.
माझ्या शेपटीवर पाय देऊ नकोस, तू काय पण पाडणार आम्ही बघून घेऊ. आमदार, मंत्री यांना गावबंदी केली, महाराष्ट्र तुमच्या सातबारावर लिहून दिला का? मला शिव्या दिल्या, धमक्या दिल्या, मी घाबरत नाही. काही लोकांनी दगडाला शेंदूर फासून याला देव केलं. हा समाजात विद्वेष पसरवत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्याच स्वकीयांवर हल्ले करायला शिकवलं होत का? ज्यांचा संबंध नाही त्यांचे घर, हॉटेल, कार्यालय जाळले. लेकरं बाळ घरात असताना घर पेटवली. क्षीरसागर यांच्या घरात महिला, लहान मूल असताना जाळपोळ करणे कितपत योग्य आहे.