हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मोबा. 9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर :- तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. नांदगाव पोडे येथे अस्थी विसर्जनासाठी गेले असता तीन लोक वर्धा नदीत बुडण्याची दुर्दैवी घटना आज दुपारी 2.00 वाजताच्या सुमारास घडली. त्यामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोविंदा पोडे हे मोठ्या वडिलांच्या अस्थि विसर्जनासाठी नांदगाव येथील वर्धा नदीच्या पात्रामध्ये अस्थि विसर्जन करण्यासाठी गेले असता त्यांचा मुलगा चेतन व भासा गणेश उपरे नदीमध्ये उतरले असता ते पाण्याच्या प्रवाहामध्ये बुडाले. त्यांना वाचविण्यासाठी गोविंदा पोडे हे सुध्दा पाण्यात उतरले नदीच्या प्रवाहामध्ये ते सुद्धा वाहून गेले. सायंकाळी ५.४५ ला मुलगा चेतन व ६.३० वाजता भासा गणेश उपरे यांचा मृतदेह मिळाले.