पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो मोबा.7020794626
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील फरासखाना पोलिस स्टेशनच्या हद्दीत शुल्लक वादातून एका युवकावर कोयत्याने सपासप वार करीत हत्या करण्यात आला. ही घटना गणेश पेठेतील ओसवाल बिल्डिंगच्या छतावर मध्यरात्रीचा सुमारास घडली. सिद्धार्थ नंदकुमार हादगे असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ हादगे आणि आरोपींचे वाद झाले होते. आरोपी कोयते घेऊन त्याच्या मागे लागले. तो ओसवाल बिल्डिंगच्या छतावर गेला असता आरोपींनी त्याला एकटे गाठत कोयत्याने सपासप वार करून त्याची हत्या केली.
याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत सलग दुसऱ्या दिवशी खुनाचा प्रकार घडला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.