Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पुण्यात भारी ! गून्हे शाखा युनिट १ ची कामगीरी.. खुना सारख्या गंभीर गुन्हयातील आरोपीस केले १२ तासात जेरबंद

पंकेश जाधव by पंकेश जाधव
November 21, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुण्यात भारी ! गून्हे शाखा युनिट १ ची कामगीरी.. खुना सारख्या गंभीर गुन्हयातील आरोपीस केले १२ तासात जेरबंद
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो 7020794626

युनिट-०१, गुन्हे शाखा, पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक २०/११/२०२३ रोजी स.नं.४८, काझी बिल्डिंग शिवरामदादा तालीम गल्ली, गणेश पेठ, पुणे याठिकाणी यातील फिर्यादी हे सिद्धार्थ हादगे व सुमित चव्हाण यांचेसह गप्पा मारत बसले असताना, तुषार कुंदुर, अशिष कुंदुर, हर्षल पवार व इतर ५ ते ६ जणांनी सदर ठिकाणी मोटार सायकलवर येवुन आपसात संगनमत करुन, सिद्धार्थ हादगे याचेशी जुन्या झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन, सिद्धार्थ याचे डोक्यात, मानेवर, गालावर व हातावर धारधार शस्त्राने वार करून त्यास जीवे ठार मारले. फिर्यादी हे त्यास पाहण्यासाठी गेले असता, सदर इसमांनी त्यांचे डोक्यात वार करुन त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. सदरबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून फरासखाना पो.स्टे. गुरनं.२३३/२०२३, भादवि कलम ३०२, ३०७,१४३,१४७,१४८,१४९, आर्म अॅक्ट ४ (२५), महा. पो. अॅक्ट ३७ (१) (३) १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्हयातील इसमांना तात्काळ ताब्यात घेणेबाबत वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी मार्गदर्शनपर सुचना देवून, युनिट-०१ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची पथके तयार करुन, शोध घेणे कामी रवाना केले होते त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शब्बीर सय्यद, युनिट-०१, गुन्हे शाखा यांचेसह युनिट कडील अधिकारी व अंमलदार हे शोध घेत असताना, पोलीस अंमलदार, अजय थोरात व अनिकेत बाबर यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी प्राप्त झाली की, शिवरामदादा तालीम मंडळाचे जवळ, गणेश पेठ, पुणे येथे सिद्धार्थ हादगे याचा खुन झाला होता. सदरचा खुन हा तुषार कुंदुर याने त्याचे साथीदारासह केला असुन, तुषार कुंदुर व त्याचा साथीदार आशुतोष वर्तले हे पौड फाटा कोथरुड येथे थांबले असुन, ते कोठेतरी बाहेर निघुन जाण्याच्या तयारीत आहे.

प्राप्त बातमीचे अनुशंगाने वरिष्ठांना कळवून स्वतः व स्टाफ यांचेसह सदर ठिकाणी तात्काळ जावुन बातमीदाराने दिलेल्या बातमी ठिकाणी जावुन पाहणी केली असता, पौड फाटा पुलाचे खाली, कोथरुड, पुणे येथे दोन इसम गडबडीत असल्याचे कोणाची तरी वाट पाहत असल्याचे दिसले. त्यांचे हालचालीबाबत संशय आल्याने, त्यांचे जवळ जावुन, त्यांना ताब्यात घेवुन, त्यांचे नाव व पत्ता विचारता, त्यांनी आपले नावे १) तुषार राजु कुंदुर, वय २१ वर्षे, रा. मेनकर वाडा, ७६२ गणेश पेठ, पुणे २) आशुतोष संतोष वर्तले, वय २० वर्षे, रा.२६ नंबर शाळे जवळ, बुरुड आळी, ७६७, गणेश पेठ, पुणे असे असल्याचे सांगितले. त्यांना सोबतचे स्टाफचे मदतीने युनिट-१, गुन्हे शाखा कार्यालयामध्ये घेवुन येवुन, त्यांचेकडे दाखल गुन्हयाचे अनुषंगाने तपास केला असता, ताब्यातील तुषार कुंदुर याने सांगितले की, माझी सन २०२१ मध्ये सिध्दार्थ नंदकुमार हादगे याचेशी भांडणे झाली होती. त्यावेळी सिध्दार्थ हादगे याने माझ्यावर व माझा भाऊ आशिष कुंदुर यांचेवर वार केले होते. त्याबाबत खडक पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे. त्यानंतर देखिल सिध्दार्थ हादगे हा मला तसेच माझ्य भावाला शिवीगाळ करणे आमच्या वस्तीत येवुन दहशत करणे असे करुन वारंवार त्रास देत होता.

दिनांक २४/१०/२०२३ रोजी एल.टी.जी मंडळा मध्ये कोजागिरी पोर्णिमेचा कार्यक्रम होता त्यावेळी सदर कार्यक्रमासाठी त्याचा फ्लेक्स लावलेला होता. त्यावेळी सिध्दार्थ हादगे याने सदर ठिकाणी येवुन दंगा करुन कार्यक्रमाचा फ्लेक्स फाडल्या मुळे माझी व सिद्धार्थ हादगे याची भांडणे झाली होती.तसेच दिनांक १९/११/२०२३ रोजी माझा मित्र हर्षल पवार हा शेर-ए-पंजाब बार येथुन जात असताना त्यास सिध्दार्थ हादगे व त्याच्या सोबतचा अक्षय अमराळे यांनी आवाज देवुन, हर्षल यास थांबवुन सिध्दार्थ व अक्षय यांनी त्यास मारहाण करुन शिवीगाळ केली होती. तेथुन हर्षल पवार त्यांच्या तावडीतुन सुटुन माझ्या घरी येवुन, मला खुप मारहाण केली आहे अशी हकीकत सांगितली त्यावेळी हर्षल पवार आशितोष वर्तले, प्रथमेश कांबळे प्रतिक करपेकर, समर्थ वर्देकर व माझा भाऊ आशिष कुंदुर असे सर्वजण महाराणा प्रताप शाळा नं.२६ व शिवरामदादा तालीम समोरील इमारती मध्ये जावुन, त्यास हत्याराने वार करुन व आशुतोष याने आणलेल्या दगडाने ठेवुन ठार मारले असे सांगितले. एकंदरीत केलेल्या तपासावरुन वर नमुद दोन्ही आरोपींनी त्यांचे इत्तर साथीदारांसह गुन्ह्याची कबुली दिल्याने व त्यांचा संदर्भीय गुन्हात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना पुढील योग्य त्या कार्यवाहीकरीता फरासखाना पोलीस ताणेचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची उल्लेखनिय कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, श्री. संदिप कर्णिक, मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे, श्री रामनाथ पोकळे मा. पोलीस उप- आयुक्त, गुन्हे, पुणे, श्री अमोल झेंडे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे-१, पुणे, श्री. सुनिल तांबे यांचे मार्गदर्शना खाली युनिट-१ कडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक, शब्बीर सय्यद, सहा. पोलीस निरीक्षक, आशिष कवठेकर, पोलीस उप-निरीक्षक, रमेश तापकीर, पोलीस अंमलदार, अजय थोरात, अनिकेत बाबर, महेश बामगुडे, निलेश साबळे, दत्ता सोनवणे यांनी केली आहे.

Previous Post

पेरमिली अंतर्गत मेडपाल्ली येते धान खरेदी उपकेंद्र व धान खरेदीदार सहाय्यक मंजूर करा: अजयभाऊ कंकडालवार

Next Post

दिघी पोलीस ठाणे तपास पथकाची दमदार कामगिरी !वाहनचोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगार अटक करुन ३,५५,०००/- रुपये किमतीच्या ७ मो/सायकल केल्या जप्त …

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
दिघी पोलीस ठाणे तपास पथकाची दमदार कामगिरी !वाहनचोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगार अटक करुन ३,५५,०००/- रुपये किमतीच्या ७ मो/सायकल केल्या जप्त …

दिघी पोलीस ठाणे तपास पथकाची दमदार कामगिरी !वाहनचोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगार अटक करुन ३,५५,०००/- रुपये किमतीच्या ७ मो/सायकल केल्या जप्त …

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In