उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गुगवाड:- धम्मभूमी येथे अथर्व चंद्रकांत सांगलीकर चॅरिटेबल ट्रस्ट, धम्मभूमी गुगवाड, संस्थापक अध्यक्ष, महाउपासक उद्योगपती महादानानू आश्रयदायक सी आर सांगलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली धम्मभूमि गुगवाड येथे कार्तिक पोर्णिमा साजरी करण्यात आली.
कार्तिक पोर्णिमा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र व कर्नाटक मधून यावेळी शेकडो उपासक व उपासिका आले होते. यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत बसवंत काटकर तसेच रावसाहेब सांगलीकर यांनी केले. यावेळी पूजनीय भदंत गोविंदो मानदो बीड, अशोक भटकर, अमर कांबळे, नगराळे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी पूज्य भदंत गोवींदो मानदो यांनी अगदी साध्या आणि जनतेला समजेल अशा भाषेत कार्तिक पौर्णिमेच महत्व सांगितले तसेच त्यांनी सुखी जीवनासाठी पाच महत्व सांगितले, श्रद्धा, धान, शिल, करुणा आणि मैत्री ही प्रत्येकानी आचरण केले तर माणूस सुखी होतो. असे प्रतिपादन केले. यावेळी आपल्या धम्म देसनामधून उपासक व उपासिकांना आपण येथून जातांना चांगले विचार घेऊन जाणे व ते अमलात आणली पाहिजे तरच धम्माचा प्रसार प्रचार होणार आहे.
त्यानंतर अशोक भटकर सर यांनी सुद्धा धम्म वाढविण्यासाठी सतत कार्यरत असले पाहिजे, तरच आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेल भारत बौदधमय करण्याचा उद्देश पर्यंत पोचता येईल असे महत्वपूर्ण प्रतिपादन केले.
यावेळी आयु.रावसाहेब सांगलीकर, आयु. श्रीमंत कांबळे, आयु. बसवंत काटकर सर, आयु. प्रदीप कांबळे, आयु. रमेश कांबळे, आयु. विजय कांबळे, आयु. सुभाष कांबळे, आयु. सुरेश कांबळे, आयु. शिवानंद मर्ढे, आयु. वाय. भी. कांबळे, हे सर्व अथर्व चंद्रकांत सांगलीकर चॅरिटेबल ट्रस्ट, धम्मभूमी गुगवाडच्या वतीने पूर्णिमा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केला.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445248 / 7385445348