सतिश रघताटे, रा. हिंगणघाट ८७८८०५९१५०
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- राज्यात येणाऱ्या काळात भूमिपूजन करतांना लोकप्रतिनिधींनी भूमिपूजनाचा फलक लावताना सोबतच एक दुसरा फलक लावावा त्यावर समंधीत कामाचा चा ठेकेदार कोण त्या कामाचा कालावधी किती, रोड किती फूट खोदायचा, सळाख किती जाडीची असावी आणि रस्त्याची जाडी किती असावी याचा उल्लेख करावा म्हणजेच रस्ता निर्माण कार्य खरचं योग्य प्रकारे होत आहे की नाही हे जनतेला कळेल. भूमिपूजन झालेल्या फलकावर बहुतेक ठिकाणी ठेकेदारांचे नावाचं नसते.विकासकामांच्या नावाखाली सर्रास कमिशन खोरी होत आहे.
हिंगणघाट शहरातील रहमतुल्ला पेट्रोल पंप ते विठोबा चौक या रस्त्याच्या बाबतीत हेचं झाले कित्तेक ठिकाणीं या रस्त्याला तडे गेले आहे काही इंच जागा खोदून रस्ता बनवला जात आहे. विकास कामे होत आहे असे जरी दाखवत असले तरी प्रत्यक्षात शासकिय निधीचा गैरवापर होत आहे आणि ते स्पष्ट दिसत आहे.
जामा मज्जिदू समोरंचा रास्ता गेल्या दोन चार वर्ष आधीं बनवला गेला आज या रस्त्याची दुर्दशा आहे. भारत शाळा ते सिंधी कॉलनी या रोड ची पणं दुर्दशा अशीच आहे. डॉ. करावा ते जूना किसान जीन या रस्त्याची अवस्था पणं अशीच आहे मोहता मिल ते मोहता चौक या रस्त्यावर सुद्धा गिट्टी उघडी पडल्याचे स्पष्ट दिसते सिमेंट रोडची कालमर्यादा फक्तं दोन तीन वर्षाचीच असतें का ? नाही न तर मग एवढ्या लवकर या रस्त्याची दुर्दशा कशी? कुठलाही सिमेंट रस्ता पाहा त्याची गीट्टी बाहेर आलेली आपल्याला दिसेल हा प्रश्न समांधित लोकप्रतिनिधींना जनतेनी विचारायलाच पाहिजे.
कोण आहेत या रस्त्याचे ठेकेदार लोकप्रतिनिधी सकाळ पासुन रात्रि पर्यन्त जे पैसे वाटप करतात ते जनतेचे तोंड बंद करण्यासाठीच एवढा पैसा ते कुठून वाटतात ते काही घरून वाटत नाही हेचं निकृष्ट दर्जाचे काम आणि त्या माध्यमातून आलेलं कमिशन म्हणुनच लोकप्रतिनिधी बहूसंख्यक समाजाला पैश्याचा जोरावर खिशात ठेवतो अशी वल्गना करतांना दिसते .लोकप्रतिनिधींचे गोडवे गात असताना जागरूक नागरिक म्हणून हे प्रश्न त्यांना आपणं विचारलेच पाहिजे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348 / 7385445348