अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो नं -9822724136
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- सावनेर येथील मा. नगरसेवक सुभाषभाऊ मछले यांची राष्ट्रीय गुरु रविदास क्रांती मोर्चा संघटनेच्या वतीने नागपूर जिल्हा सहसचिव पदी 1 वर्षाकरिता नियुक्ती झाली.
ही नियुक्ती विजयराज शेगेकर प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीमुळे शहरात त्याच्या कार्यकर्त्यात आनंदाचे वातावरण तयार झालेले आहे.
सुभाषभाऊ मछले यांची नागपूर जिल्हा सहसचिव नियुक्ती झाल्याबद्दल त्यांनी राष्ट्रीय गुरु रविदास क्रांती मोर्चा संघटनेचे आभार मानले. सुभाषभाऊ मछले यांची सहसचिव पदी नियुक्ती झाल्याबद्दल गजानन ढोले, अशोक छत्रे,भगवान चांदेकर, रमेश पहाडे, राजू छत्रे, देवेंद्र छत्रे, निरंजन चांदेकर, राजेंद्र चवडे सर,वामन चांदवे,नरेश मछले व नरेश छत्रे इत्यादींनी शुभेच्छा दिल्या.