डॅनियल अँन्थोनी, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पिंपरी:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे शुल्लक कारणावरून वादात एक मित्राने आपल्याच मित्राचा खून करून पसार झाल्याची घटना घडली आहे. या आरोपी इसमाला शोध घेऊन मोठ्या शितफीने त्याला देहूरोड पोलीस ठाणे तपास पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.
देहूगांव येथील इंद्रायणी नदी काठावर बुधवारी रात्री २२ रोजी मध्यरात्री उसने पैसे दिले नाहीत म्हणून मित्राने मित्राचा निघृण हत्या केला होती. देविदास भराडे रा. इदेवाडी वसाहत परभणी असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून आरोपी जितेंद्र रामसजीवन शुक्ला वय ५२ वर्ष, मध्य प्रदेश येथील रीवा जिल्हातील फिरस्ता मूळ रा. पतई हा हत्या केल्यानंतर फरार झाला होता.
पोलीस उपायुक्त डॉ,काकासाहेब डोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार ,देहूगांव इंद्रायणी नदीकाठी एका इसमाचा खून झाला असलेली घटना घडली होती .दगडाने ठेचून निघृणपणे हा खून करण्यात आला होता .देहूरोड पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंद असल्याने पोलिसांनी शोध सुरू केला .आरोपीने शांत डोक्याने पाठीमागे कोणताही पुरावा न ठेवता खून केल्याने आरोपीला शोधण्याचे देहूरोड पोलिसांमुळे आव्हान निर्माण झाले.
दरम्यान देहूरोड पोलीस आणि तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळ परिसरातील ५० – ५५सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ,त्यामध्ये एक अनोळखी इसम कमरेपासून खाली अर्धवट स्थितीत हालचाल करताना दिसून आला त्या अनुषंगाने तपास पथकाने परिसरात माहिती घेतली असता पथकाकडे पुरेशी माहिती प्राप्त झाली नाही.
या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पथकातील पोलीस हवालदार प्रशांत पवार पोलीस नाईक यादव व पोलीस शिपाई निलेश जाधव यांना माहिती मिळाली की एक ४०ते ४५ वयोगटातील रंगाने गोरा तसेच पांढरे केस असलेला शुक्ला नावाचा इसम घटनास्थळी असलेल्या चहा पिण्याकरिता येत होता आणि तो मयत देविदास भराडे यांचा मित्र होता.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्री फिरवली शुक्ल नावाच्या इसमाचा मोबाईल क्रमांक प्राप्त करून त्याची माहिती काढली असता तो वाकड परिसरात राहत असल्याची माहिती पथकाला मिळाली पथकाने तत्काळ वाकड परिसरात खात्री केली असता पोलिसांची कुणकुण लागताच तो तिथून पळून गेला.
पोलीस पथकाने सखोल माहिती घेतली असता शुक्ला हा मध्य प्रदेश इंदूर येथील राहणारा असल्याची माहिती प्राप्त झाली तो रेल्वेमधून गावी पळून जाण्याची शक्यता असल्याचे वरिष्ठांनी आकुर्डी रेल्वे स्टेशन ,पुणे रेल्वे स्टेशन ,आणि वाकड परिसर अशी तीन स्वतंत्र पथके रवाना केली .दरम्यान शुक्ला हा वाकड परिसरातील तारीफ हॉटेल समोर उभा असल्याची माहिती प्राप्त होताच पथकाने त्याला शिताफीने ताब्यात घेतले चौकशी दरम्यान उसने पैसे दिले नाहीत म्हणून राग आल्याने खून केला असल्याची कबुली शुक्ला याने पोलिसांना दिली आहे पुढील तपास देऊन पोलीस करीत आहेत.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहआयुक्त डॉ.संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे सहाय्य पोलीस आयुक्त पद्माकर घनवट, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्य पोलीस निरीक्षक दिगंबर अतिग्रे, योगेश गायकवाड, उपनिरीक्षक सोहन धोत्रे, पोलीस कर्मचारी प्रशांत पवार, बाळासाहेब विधाते, सुनील यादव, विजय केंगजे, निलेश जाधव, केतन कानगुडे, सचिन शेजाळ, संतोष महाडिक ,किशोर परदेशी, मोहसीन अतार,प्रशांत माळी, सागर पंडित यांच्या पथकाने मिळून ही कामगिरी केली आहे.