उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बुलढाणा:- जिल्हातील मेहकर येथील जामगाव मध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या लेआउट टाकून लोकाची फसवणूक करण्यात येत असल्याची खळबळ उडवून देणारी माहिती समोर येत आहे. याबाबत तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपभाऊ गवई यांनी याबाबत निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मेहकर येथील जामगाव येथे भाग-1 मध्ये गट नं 21/1 अ व जामगाव मध्ये गट नं. 37/- व 53, शासन नियमानुसार ले आउट झालेले नाही याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदनाद्वारे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आशी मागणी उपविभागीय अधिकारी मेहकर यांना करण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी ह्यांनी NAP/34 बोगस करुन दिल्या बाबत हे सर्व गट 21/1- अ मेहकर भाग-1 जामगाव गट न. 37, व 53 मध्ये सुद्धा शासनाच्या अट व नियमानुसार ले आऊट झालेले नाही व त्या लेआऊट मध्ये ग्रीन झोन प्रतिबंध असुन लेआऊट रोड व लाईन डेव्हलपमेंट नसुन त्या लोकांची फसवणूक व दिशाभुल करीत आहे. तरी ह्या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप भाऊ गवई यानी केली आहे.