रायगड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन रायगड:- जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे कोकणकन्या एक्स्प्रेसखाली उडी मारून एका महिलेने तिच्या दोन मुलींसह आत्महत्या केली आहे. दिनांक 1 नोव्हेंबर शुक्रवारी सकाळच्या सुमारास माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथे ही घटना घडली आहे. ही घटना समोर येताच संपूर्ण जिल्हात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
प्राप्त माहितीनुसार, सकाळी 3.00 वाजताच्या सुमारास एका महिलेने तिच्या दोन मुलींसह कोकणकन्या या एक्स्प्रेस ट्रेनखाली उडी घेत आत्महत्या केली आहे. नवऱ्याच्या सततच्या जाचाला कंटाळून महिलेने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे आत्महत्येपूर्वी महिलेने तिच्या मैत्रिणीला व्हॉट्सॲपवर व्हॉइस मेसेज पाठवला त्यातून समोर आले आहे.
काय आहे ही घटना:
कोकणकन्या या एक्स्प्रेस ट्रेनखाली उडी घेत माणगावच्या गोरेगाव येथील महिलेने आपल्या मुलीसह आत्महत्या केली आहे. पहाटे 3.00 वाजताच्या सुमारास या महिलेने आपल्या पोटच्या मुलीसह आपले जीवन यात्रा संपवली.
आत्महत्येपूर्वी मैत्रीणीला केला व्हॉइसमेसेज:
आत्महत्या केलेल्या महिलेने आत्महत्या करण्या पूर्वी आपल्या एका मैत्रिणीला व्हॉइसमेसेज केला होता. त्यात तिने नवऱ्याच्या जाचाला कंटाळून दोन्ही मुलींसह आत्महत्या करत असल्याचे म्हटलं होते. त्यानंतर मैत्रिणीने लगेचच पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली मात्र तिथे महिलेचा व तिच्या एका मुलीचा मृतदेह आढळून आला. मात्र, दुसरी मुलगी अद्याप बेपत्ता आहे. पोलिसांकडून व स्थानिकांकडून तिचा शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत असून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाहीये.