विदर्भवीर कै.राजे विश्वेश्वरराव महाराज यांचे आशीर्वाद घेत ऍड. वामनराव चटप यांचा नेतृत्वाखाली संकल्प यात्रेला सुरुवात.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- वेगळे विदर्भ राज्यासाठी कट्टर विदर्भवादी नेते कै.राजे विश्वेश्वरराव महाराज, कै.राजे सत्यवानराव महाराज यांचा नेतृत्वाखाली झालेल्या अनेक आंदोलनाची साक्षीदार असणाऱ्या विदर्भ आंदोलनाची जन्मभूमी राजनगरी अहेरी येतूनच पुन्हा नव्या जोमाने जनतेमध्ये जनजागृती करून स्वतंत्र विदर्भ राज्य आंदोलन पटविण्यासाठी विदर्भ निर्माण संकल्प यात्रेची सुरुवात काल करण्यात आले.
जीवनाचा शेवटच्या श्वासापर्यंत स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी संघर्ष करणारे विदर्भवीर कै.राजे विश्वेश्वरराव महाराज यांच्या अहेरीतील मुख्य चौकातील पूर्णाकृती पूतळ्याला पुष्पहार अर्पण करुन त्यांचे आशीर्वाद घेत माजी आमदार ऍड. वामनराव चटप आणि माजी जिल्हा परिषदचे अध्यक्ष तथा कृषी बाजार समितीचे सभापती अजय भाऊ कंकडावार यांचा नेतृत्वाखाली ही संकल्प यात्रा अहेरी येथून सुरू करण्यात आले ह्यावेळी जय विदर्भचा नार्यांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला, ह्या प्रसंगी मोठ्या संख्येने विदर्भवादी नेते तथा सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.