हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मोबा. 9764268694.
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- मल्टीपर्पज एज्युकेशन सोसायटी चंद्रपूर द्वारा बल्लारपूर येथे 1 डिसेंबर ला जागतिक एड्स दिनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या कु.विशाखा झाडे तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव श्री.शैलेश झाडे, कार्यक्रमाचे मुख्य अतिथी श्री. सचिन तल्हार, प्रयोग सहायिका कू. स्मिता काकडे उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक संदेश वनकर यांनी केले.
एड्स या विषयावरती सविस्तर मार्गदर्शन कार्यक्रमाचे मुख्य अतिथी बल्लारपूर ग्रामीण रुग्णालय येथील समुपदेशक माननीय सचिन तल्हार यांनी केले. तसेच संस्था सचिव प्राध्यापक श्री. शैलेश झाडे यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या कू .विशाखा झाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे निवारण केले. तसेच या कार्यक्रमाला महाविद्याल्याचे प्राध्याक वर्ग उपस्थित होते तर संचालन गौरव मेश्राम व आभार प्रदर्शन महेश गडकर या विद्यार्थ्यांनी केले.