महादुला तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कोराडी:- महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचालनालय पुणे व्दारा संजीवन कॉलेज पन्हाळा कोल्हापूर येथे पार पडलेल्या शालेय फुटबॉल 19 वर्षीय मुलींचा संघ राज्य स्तरावर उपविजेता ठरून रौप्य पदक पटकावलेले आहे. या संघातील तीन मुलीं कु. दिव्या कैलास येळेकर, कु. कृतिका सुनिल राउत, कु. श्रृती दामोधर घोडाकाडे यांची राष्ट्रीय स्पर्धेकरिता महाराष्ट्र राज्य संघात निवड झालेली आहे.
राष्ट्रीय स्पर्धेकरिता महाराष्ट्र राज्य संघात निवड झालेल्या मुलींना पुढील वाटचालीकरिता प्रागतिक अध्यापक शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या. संस्थेचे अध्यक्ष वामनराव कुरळकर, उपाध्यक्ष वसंतराव गाडगे, सचिव प्रकाश कुंभलकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. विद्या समरीत, तसेच पर्यवेक्षक व क्रीडा शिक्षक प्रल्हाद दुधपचारे आणि विभाग प्रमुख सौ. अर्चना उरकुडे, प्राथ. मु.अ. उमेश वानखेडे प्रशिक्षक संजय ढवळे, विशाल गर्गेलवार, विजय गोमकर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजेत्या खेळाडुंचे अभिनंदन केले.