जालना जिल्हाधिकारी पांचाळ साहेब आपण परतूर मधील माफियाराज संपवणार का?
रवींद्र भदर्गे, जालना उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- परतुर येथील तहसीलदार डॉ.गोरे मॅडम यांच्या निवासस्थाना बाहेर वाळू माफियांनी वाळूचे ट्रॅक्टर खाली केले आहे. या गोष्टीचा तहसीलदार मॅडम यांना परतूर येथिल पत्रकर यांनी खुलासा मागितला असता त्यांनी कुठल्याही प्रकारचा खुलासा दिला नाही. सामान्य नागरिका कडून प्रश्न विचारल्या जातो की, परतूर हे वाळू माफिया कडून परतूर शहर हे काही बिहार झाले आहे का?
त्यामुळे शाळकरी मुले, वृद्ध, महिला यांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाळू माफियांची इतकी मुजोरी वाढली आहे की, ते भर दिवसा व रात्र रात्रभर अक्षरशः तहसील समोरून वाळूचे ट्रॅक्टर, ट्रक घेऊन जात आहे. परंतु महसूल प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे परतूर येथील वाळू माफिया यांचे मनोबल वाढून त्यांनी खुद्द तहसीलदार तथा प्रभारी उपविभागीय अधिकारी यांच्या निवासस्थाना बाहेर वाळू खाली केली आहे. या विषयी मा. जिल्हाधिकारी जालना काही कारवाई करणार का? व या परतूर मधील वाळू माफिया यांच्यावर कारवाई करतील का हाच प्रश्न सर्व सामान्य कडून विचारला जात आहे.
दी.07/12/2023 रोजी संध्याकाळी तहसीलदार यांच्या गेट समोर वाळू टाकणाऱ्या वाळू माफियांवर कारवाई होणार का?