प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मो . 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- महाराष्ट्रातील युवकांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्याकरिता आमदार रोहितदादा पवार यांच्या नेतृत्वात पुणे ते नागपूर ७५० किमी. ची पदयात्रा ‘युवा संघर्ष यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे ही यात्रा आज सायंकाळी वर्धा शहरामध्ये दाखल झाली. या युवा संघर्ष यात्रेमध्ये मी सहभागी झालो आमदार रोहितदादा पवार, रोहित पाटील त्यांच्या नेतृत्वात खाली युवा संघर्ष यात्रा आयोजित झाली आहे.
या यात्रेच्या माध्यमातून युवकांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, अनेक सामान्य नागरिकांचे प्रश्न, मुख्यमंत्री कडे हे सर्व प्रश्न मांडतील युवा संघर्ष यात्रा च्या उद्देश आहे उपस्थित केलेल्या युवांच्या मागण्यांना पाठींबा दर्शविला. तसेच युवा संघर्ष यात्रेच्या वतीने आयोजित कन्हैय्या कुमार यांच्या जाहीर सभेला उपस्थित राहणार आहे.
या पदयात्रे मध्ये आमदार रोहितदादा पवार, रोहित आबा पाटील, वर्धा जिल्हा माजी पालकमंत्री आमदार सुनील केदार, माजी आमदार सुरेशभाऊ देशमुख, समीरभाऊ देशमुख, माजी आमदार राजुभाऊ तिमांडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हाध्यक्ष सुनीलभाऊ राऊत, नितेश कराळे, प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस संदीप किटे, वर्धा जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस प्रणय कदम, वर्धा जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस गुरुदयालसिंग जुनी, प्रशांत दारोडे, आकाश अढाल, जयदेव सिंग बावरी व अनेक मोठ्या संख्येने युवा व कार्यकर्ते उपस्थित होते.