अनिल अडकीने सावनेर तालुका प्रतिनिधि
मो. नं. : ९८२२७२४१३६
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर ८ डीसेंबर:- मागील पंधरा दिवसांत सावनेर तालुक्य झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील कापुस व तुर या पिकांचं भरपूर नुकसान झालेल आहे.तुरीचा संपूर्ण फूले गळलेले असून चलप देखील करपल्या आहे.त्यामुळे शेतकऱ्याला येणार्या तुर पिकाच 70% नुकसान या पावसाने केल आहे. त्याचबरोबर फुललेला कापुस पाण्याने भिजून काळा पडल्याने क्विंटल वर 500-600 रू कमी दराने खरेदी केला जात आहे आणि अर्ध फुललेले बोंड आत मधे पाणी गेल्याने सडले आहेत.पंधरा दिवसाआधी हिरवी असलेली पराटी या अवकाळी पावसाने करपली आहे.
आधिच कमी उत्पादनाची मार सोसणाऱ्या शेतकरी बांधवाची समाधानकारक पिक होण्याची शेवटची आशा देखील संपुष्टात आली आहे. त्यामुळे शासनाकडून यंदा फक्त 1 रुपयात शेतकऱ्यांचा पिक विमा काढण्यात आला आहे, लाखो रुपए सरकारकडून विम्याचा प्रीमियम रुपाने विमा कंपन्यांना देण्यात आले आहे.
मात्र मिळालेल्या माहितीनुसार पिक विमा कंपन्या दि. 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत प्राप्त झालेल्या तक्रारी मध्ये फक्त तूर आणि धान याच पिकांचे क्लेम स्वीकारणार असून कापुस पिकाचे आता नुकसान झालेच नाही अशी अशी भूमिका घेत आहे.
त्यामुळेच आज भाजपाकडून तहसीलदारांना निवेदन देत तुरी सोबतच कापुस पिकांची देखील नुकसान भरपाई विमाधारक शेतकऱ्यांना मिळावी याकरिता निवेदन देण्यात आले. यावेळेस शहर अध्यक्ष राजु घुगल, तुषार उमाटे, सोनू नवधिंगे, विनोदकुमार बागडे, निलेशसिंग ठाकूर, पिंटू सातपुते, आशीष मानकर आदि उपस्थित होते.