अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधि
मो.नं.-९८२२७२४१३६
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- नागपूर अधिवेशन वर १० डीसेंबर रोजी तब जब संघटना (ठगी पिढीत जमाकर्ता परीवार) द्वारा हल्ला बोल मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष मदनलालजी आजाद यांच्या नेतृत्वात निघेल.
2014 पासून सरकारने तमाम कंपन्या बंद पाडलेल्या आहेत. देशभरात तीन लाख कंपन्या बंद पडलेल्या आहे. ह्या कंपन्या मध्ये गोरगरीब जनतेचे पैसे अजूनही अडकलेले आहे. सर्वांचे पैसे मिळण्यासाठी २०१४ पासून गोरगरीब जनता त्रासलेली आहे. नॉन बँकिंग सेक्टर मध्ये, सेबी अंतर्गत ज्या कंपन्या येतात. त्या कंपन्यामध्ये पर्ल्स, सहारा, समृद्धी, साईप्रसाद, साईप्रकाश, मैत्री ग्रुप, कलकाम ग्रुप, रियल इन्फ्रा, एस जे हिमांगिनी, एचबीएन, एपीएनजे, समृद्ध जीवन, वसुंधरा सम्राट, लाइफ सनराइज, सनशाइन डेव्हलपमेंट कंपनी, संचयनी, अनमोल इंडिया डायमंड अग्रो, श्रीराम समर्थ टुरिझम कंपनी, मायक्रो फायनान्स, अशा बऱ्याच कंपन्या आहेत. हया कंपन्याची २०१४ पासून ठगी झालेली आहे. तेव्हापासून या संपूर्ण कंपन्यांमध्ये ग्राहकांचा अडकलेला पैसा अजूनही भेटलेला नाही. त्याकरिता सर्व कंपन्याचे ग्राहक व अभिकर्ता यांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहून ह्या अधिवेशनाच्या महामोर्चात सहभागी व्हावे. हा मोर्चा ११ तारखेला यशवंत स्टेडियम इथे जमा होऊन तो सकाळी 10 वाजता. अधिवेशनावर निघेल.
मी सर्व जनतेला आव्हान करतो की ज्यांची ज्यांची पैसे फसलेले आहेत त्यांनी या महामोर्चामध्ये सहभागी होऊन आपला बहुमूल्य वेळ द्यावा. मोर्चाचे सूत्रसंचालक देवरावजी दुधबळे राष्ट्रीय महामंत्री, विलास देशमुख राष्ट्रीय सचिव, सीमा येसनकर मॅडम प्रदेशाध्यक्ष, वर्षा लांडे मॅडम प्रदेश उपाध्यक्ष, राजेंद्र शरणागत प्रदेश प्रवक्ता. नागपूर जिल्हा अध्यक्ष देवेंद्र पटले, पुरुषोत्तम कीर्तने चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष, वर्धा जिल्हा अध्यक्ष गुणवंत कोठेकर, गोंदिया जिल्हाध्यक्ष दिनेश राणे, भंडारा जिल्हाध्यक्ष रामेश्वर गडेकर, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष मीना मते, नागपूर जिल्हा कमिटी पदाधिकारी प्रशांत ताकसांडे, नागपूर जिल्हा उपाध्यक्ष रविशंकर ठाकूर, सचिव दीपक सावळकर, रवींद्र डोंगरे महासचिव, प्रवीण आदमने कोषाध्यक्ष व इतर पदाधिकारी यांच्या संयोजनात ह्या महामोर्चा निघणार आहे.

