मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- 13 डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिन तथा समता सप्ताह निमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी इनरव्हील क्लब ऑफ हिंगणघाट यांच्या संयुक्त विद्यमाने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यावेळेस सोनवणे मॅडमनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविक खूप सुंदर शब्दात केले. ‘जन्माला आलेलं प्रत्येक मुल हे वेगळं असतं. देवाने प्रत्येकाला मेंदू दिलेला आहे व त्या मेंदूचा उपयोग प्रत्येक जण आपल्या क्षमतेनुसार करीत असतो”. दैवयोगाने काही मुलांना जन्मापासूनच तर कधी कधी ओढवलेल्या परिस्थितीमुळे दिव्यांगत्व प्राप्त होत. अशा दिव्यांगत्व प्राप्त झालेल्या मुलांमध्ये अनेक क्षमता असतात. गरज असते ती त्यांच्या त्या क्षमतांना वाव मिळण्याची से प्रतिपादन केले
इनरव्हील क्लब ऑफ हिंगणघाट द्वारे वेगवेगळे उपक्रम राबवून समाज हितोषी काम सतत केले जाते. समाजाप्रती असलेले दायित्व जाणुन दिव्यांग विद्यार्थी दुर्लक्षित न राहता त्यांच्यामध्ये असलेल्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून इनर व्हील क्लब ऑफ हिंगणघाट व पंचायत समिती हिंगणघाट येथील समग्र शिक्षा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रकला स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा यामध्ये नृत्य, वेशभूषा, एकपात्री कला तसेच रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये क्लब द्वारे सर्व मुलांना मेडल्स तसेच डॉक्टर प्रणाली सायंकार मॅडम कडून गोष्टींची पुस्तक मुलांना देण्यात आली. ज्यामध्ये संपूर्ण हिंगणघाट तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेऊन आपल्यातील कलागुणांचे अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने सादरीकरण केले. तसेच इच्छाशक्ती प्रबळ असेल तर मनुष्य पाय नसताना सुद्धा चालूच काय नाचू पण शकतो हे सुद्धा विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष आपल्या कृतीतून दाखवून दिले. तसेच अविश्वसनीय असे कलागुण सादर करून प्रेक्षकांनाच नाही तर आयोजकांना सुद्धा मंत्रमुग्ध केले.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून हिंगणघाट तालुक्याचे गटविकास अधिकारी श्री अंजने उपस्थित होते तसेच गटशिक्षणाधिकारी सौ. सोनवणे तसेच इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा पूजा हुरकट व सचिव सारिका डोंगरे उपस्थित होत्या.
तसेच या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संगीता गडवार, मेघा नाहार, डॉ. रूपल कोठारी, पूनम गोयंका, विद्या पेंडके, माधुरी शिवणकर यांनी सहकार्य केले. यापुढेही दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उत्थानासाठी इनर व्हील क्लब ऑफ हिंगणघाट कटीबद्ध आहे व त्या दृष्टीने विविध उपक्रमाचे आयोजन क्लब द्वारे आयोजित करण्यात आले. तसेच पंचायत समितीतील सर्व अधिकारी, समग्र शिक्षा अभियाना मधील सर्व कर्मचारी यांचा सहयोग असल्यामुळे हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. यावेळी इनरव्हील क्लबने सर्वांचे आभार व्यक्त केले.