बालाजी शिंदे, पुणे प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने पोलीस स्टेशन मध्ये महिला पोलिसाना मारहाण केली. ही घटना समोर येताच संपूर्ण पोलीस विभागात एकच खळबळ माजली आहे.
एका महिलेने पोलिसात दिलेली तक्रार अर्जाचा अहवाल वाचून दाखवत असताना हा तक्रार अहवाल त्या फिर्यादी महिलेच्या मनाप्रमाणे नसल्याच्या कारणावरुन एका महिलेने महिला पोलीस हवालदाराला मोबाईल फेकून मारत धक्काबुक्की केली. हा प्रकार सेंट्रल बिल्डींग येथील अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग यांच्या कार्यालयात सोमवारला दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास घडला. याप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत महिला पोलीस हवालदार राखी योगेश खवले नेमणूक – पोलीस मुख्यालय, शिवाजीनगर, पुणे यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी श्वेता प्रमोद कदम रा. सिद्धार्थ नगर, येरवडा गावठाण, पुणे हिच्यावर आयपीसी 353, 332, 186, 506 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने दिलेल्या तक्रार अर्जाच्या अनुशंगाने अपर पोलीस आयुक्त यांना सहायक पोलीस आयुक्त खडकी यांनी अहवाल पाठवला होता. अहवाल पाहून फिर्यादी राखी खवले या अर्जदार (आरोपी महिला) यांना सांगत होत्या. त्यावेळी आरोपी महिलेने हा अहवाल मनाप्रमाणे नसल्याच्या कारणावरुन गोंधळ घालून आरडाओरडा केला. त्यावेळी महिलेला कार्यालयातून बाहेर जाण्यास सांगितले. याचा राग आल्याने तिने तिच्या हातातील मोबाईल राखी खवले यांच्या डोक्यात फेकून मारून त्यांना धक्काबुक्की केली. तसेच पाहून घेण्याची धमकी दिली.
महिलेला बंडगार्डन पोलीस ठाण्यात नेण्यात आले त्यावेळी देखील तिने तेथील पोलीस अंमलदार यांच्यासोबत झटापट करुन सरकारी कामात अडथळा निर्माण केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तांगडे करीत आहेत.