प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मो . 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- १९ डिसेंबर २०२३ रोज मंगळवार ला सकाळी ११:०० वाजता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व वंचित बहुजन विकास आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने नगरपरिषद हिंगणघाट येथील विविध समस्येबाबत स्थानिक कार्यालय कारंजा चौक इथून मुख्य मार्गावरून चालत नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देण्याकरिता माजी नगराध्यक्ष चंद्रकांत घुसे, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र खूपसरे, बहुजन विकास आघाडीचे अशोक रामटेके व तालुकाप्रमुख सतीश धोबे, माजी नगराध्यक्ष सुरेश मुंजेवार, शहरप्रमुख सतीश ढोमणे यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन देण्यात आले. निवेदन देताना सर्वप्रथम शिष्टमंडळातर्फे नगरपरिषदेच्या गलथान कारभारामुळे शहरातील सामान्य जनतेला होणारा जो नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यावर विशेष चर्चा करण्यात आली.
विविध समस्या खालील प्रमाणे- १) नगरपरिषद हिंगणघाटच्या कर विभागाकडून मागील सात ते आठ वर्षापासून मा. सर्वोच्च न्यायालय यांनी दिलेल्या दिनांक २०जुलै २०१५ च्या आदेशाचे उल्लंघन करून जनतेकडून मनमानी मालमत्ता कर वसुली करीत आहे. सन २०१५ ला सर्वोच्च न्यायालयाने २०१५ – २०१६ च्या नगर परिषदेने केलेल्या करमुल्यांकनाला रद्द करून २००६ – २००७ च्या केलेल्या कर मूल्यांकनाप्रमाणे मालमत्ता करवसूल करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले होते. त्याची प्रत या निवेदनासोबत जोडलेली आहे. आमचे मत असे आहे की, नगरपरिषदेने सर्वोच्च न्यायालयाचे आदेशाची पायमल्ली केली असून त्यांच्यावर कोर्ट आफ कंटेंम्टचा गुन्हा दाखल करण्यात यावा.
२) मागील सात ते आठ वर्षांपूर्वीपासून अमृत योजनेतील मल निसारण गटार व्यवस्था व पिण्याचे पाण्याकरिता पाईपलाईन सह बारा पाण्याची टाकी याची दुरावस्था बाबत या निवेदनातून मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली. मुख्याधिकाऱ्यांना आम्ही कळविले की, मल निसारण व पिण्याचे पाण्याची नवीन पाईप लाईन जोडणीचे काम पूर्ण होत नाही. तोपर्यंत कुठल्याही नवीन विकास कामाला मान्यता देऊ नये.
३) घरकुल योजना: पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत मागील दोन वर्षापासून घरकुल लाभार्थ्यांना तिसरा टप्प्याचे अनुदान अजून पर्यंत वितरित करण्यात आलेले नाही. म्हणून त्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचण येत आहे. त्यांना स्वतःच्या कुटुंबातील आर्थिक बाजू सांभाळून खाजगी बँक तसेच खाजगी सावकारांचा सामना सुद्धा करावा लागत आहे. म्हणून आपण वरील विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन लवकरात लवकर तिसरा टप्पा त्यांना मिळवून देण्याचे सहकार्य करावे.
४) तसेच नगरपरिषद मध्ये सध्या स्थाई नगर रचनाकार अधिकारी, नसल्यामुळे जनतेला मोठ्या प्रमाणात त्यांच्या बांधकाम मंजुरीसाठी त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात आपण वरिष्ठांशी बोलून ताबडतोब कायमस्वरूपी नगररचनाकाराची नियुक्ती करून घ्यावी. जेणेकरून जनतेला वेटीस धरता येणार नाही.
५) महाराष्ट्र शासनाने ज्या नवीन कर निर्धारण करण्यावर बंदी घातली आहे .असे मा. आमदार यांनी शहरातील विविध भागात फलक लावून जाहीर केले होते. तरी आपल्या विभागामार्फत नवीन मालमत्ता कर निर्धारण मोजणी करिता शहरातील विविध भागात आपण ठरवलेल्या एजन्सीचे कर्मचारी फिरत आहे. याबाबत आमदार जे म्हणताय ते खरं आहे की, आपण खरे याबाबत जाहीररित्या खुलासा करावा.
६) नगर परिषदेच्या स्वास्थ विभागातील साफसफाई कर्मचारी अनुकंपा धारक अर्जदारांना अजून पर्यंत का घेण्यात आले नाही. व ते भरले नसतील तर आपण लवकरात लवकर अनुकंपा धारक कर्मचारी भरून घेऊन त्या विभागा अनुशेष पूर्ण करावा.
७) नगरपरिषदेने मागील दोन वर्षांपूर्वी ट्रक टर्मिनल साठी नांदगाव चौरस्ताच्या बाजूला नगरपरिषद हद्दीतील त्या जागेवर सुरक्षा भिंत चे काम केले. परंतु आजही ते काम अर्धवट असून ते काम केव्हा पूर्ण करणार ?
शिवसेना व वंचित बहुजन विकास आघाडी तर्फे नम्र निवेदन आहे की जर नगरपरिषद हिंगणघाट आपल्याकडून कर निर्धारण सन २००६-२००७ च्या अन्वये मालमत्ता कर आपल्याकडून घेत नसेल तर आमच्याशी संपर्क साधावा. वरील सर्व सातही विषयावर आपण गंभीर राहून ताबडतोब निर्णय घ्यावा अन्यथा पुढे निवेदन न देता, नगर परिषद हिंगणघाटच्या मुख्य द्वारापाशी मंडप टाकून धरणे आंदोलन करण्यात येईल. अशा इशारा यावेळी निवेदन देताना देण्यात आला.
यावेळी उपतालुकाप्रमुख प्रकाश अनासाने, मनीष देवडे, श्रीधर कोटकर, माजी नगरसेवक अशोक पराते, सामाजिक कार्यकर्ता मनोज रुपारेल, माजी उपाध्यक्ष भोलासिंग चव्हाण, सुनील आष्टीकर, दिलीप चौधरी, बंटी वाघमारे, पवन तिवारी, रंजीत रहाटे, बलराज डेकाटे, अनिल लालटेंवर, दिलीप वैद्य, तुळशीदास हिंगे, अशोक भाले, रवी कांबळे, रमेश घोडे, भास्कर ठवरे, सचिन मुळे, नितीन वैद्य, गजानन काटोले, शंकर मोहमारे, अनंता गलांडे, विवेक कांबळे, नरेंद्र गुळकरी, अनिल कडू, गोवर्धन शाहू, प्रशांत कांबळे, अमोल मानकर, निखिल जीबड, प्रकाश भुसारी, आशिष भांडे, राजू शेवाळकर, लक्ष्मण कापकर, दिलीप आंमगे, महादेव कोल्हे, विजय कुकडे, गजानन येनोरकर, किशोर तितरे, मोहन पाडवे, विनोद मोहोड, अनंता सोरटे, राजेश बोंडे, प्रशांत मांडवे, आशिष भगत, संदेश मानकर, सौरभ कांबळे, अजय डोंगरे, अतुल मेंढे, शैलेश मेंढे, राहुल मोहितकर, संजय चावरे, वसंता पेटकर, धीरज गाताडे, हार्दिप काळे ,प्रभाकर खडसे, शंकर डोंणबळे, विनोद पेटकर, मोहन जाधव, आनंद जगताप, श्रीराम सातघरे, नितेश चंदनखेडे, दीपक सुर्वे, आनंद जनबंधू, अजबराव शेंडे, विनोद भुते, विकास दाणी, मधुकर भिसेकर, श्रीकृष्ण रामगडे, माधव वाघमारे, मनोज निखाडे, नितेश भोपळे, राकेश भोंगळीकर, राजू निरगुडे, प्रशांत पाटील इत्यादी शिवसैनिक व वंचित बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.