अनिल अडकिणे सावनेर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. सावनेर तालुक्यातीलवल खापा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील क्षुल्लक वादातून एका सुनेने आपल्या पती आणि मुलाच्या मदतीने आपल्याला वृद्ध सासूची निर्घृण पणे खून केल्याचे समोर येत आहे. ही घटना रामडोंगरी येथे घडली असून सुलकाबाई चाचेरे वय 80 वर्ष असे असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. या खून प्रकरणी किसन जोंधरू चाचेरे, त्याची पत्नी सेवनबाई वय 50 वर्ष व मुलगा मुन्नालाल किसन चाचेरे या तिघांविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा गुन्हा दाखल करून एका आरोपिला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.
प्राप्त माहितीनुसार, चाचेरे कुटुंब हे मुळचे चोपा, ता. गोरेगाव, जिल्हा गोंदिया येथील रहिवासी आहेत. ते रामडोंगरी शिवारातील पौनीकर, रा. खापरखेडा, ता. सावनेर यांच्या विटांच्या भट्टीवर कामगार म्हणून काम करण्यासाठी आले होते. ते भट्टीच्या आवारात असलेल्या झोपडीत राहायचे. मुन्नालाल आणि सुकलाबाई यांच्यात नेहमीच काहीना काही कारणामुळे भांडण व्हायची. सोमवारी रात्रीही त्या दोघांचे भांडण झाले. याच भांडणात मुन्नालालने सुकलाबाईच्या डोक्यावर दगडाने वार केले. गंभीर दुखापतीमुळे तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सुकलाबाईचा मृत्यू होताच तिघांनी तिचा मृतदेह ओढत झोपडीत नेला. त्यानंतर तो मृतदेह पोत्यात बांधला. जवळच असलेल्या जंगलात फेकला.
पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी किसनने सोमवारी सकाळी खापा पोलिस ठाणे गाठून सुकलाबाई बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली. मात्र त्याच्या बोलण्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. यावेळी आरोपी मुलाने आपल्या जन्मदात्या आईची हत्या केल्याची कबुली दिली.
हत्येची कबुली दिल्यानंतर ताबडतोब त्याच्यासह पत्नीला अटक केली. याच काळात मुख्य आरोपी मुन्नालाल पळून गेला. पुरावे नष्ट करण्यासाठी मुन्नालाल, त्याची आई आणि वडिलांनी सुकलाबाईचा मृतदेह जंगलात फेकला. पोलिसांनी हितेश बनसोड यांच्या मदतीने जंगलातून मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. याप्रकरणी खापा पोलिसांनी भादंवि 302 अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मनोज खडसे करीत आहेत.