विश्वनाथ जांभूळकर, एटापल्ली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- नगर पंचायत अंतर्गत सुरू असलेल्या विकास कामात मोठ्या कंत्राटदारामार्फत प्रमाणात भष्ट्राचार सुरू असल्याचा खळबळजनक आरोप गावातील नागरिकांनी लावला आहे. या कामात काही भष्ट्र अधिकाऱ्याची मुखसंमती असल्याची चर्चा पण संपूर्ण गावात सुरू आहे. त्यामुळे या विकास कामावर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
एटापल्ली नगर पंचायत कडुन गावात नगरोउत्थान महाअभियान योजना अंतर्गत प्रभाग क्रमांक 4 मध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय ते कालीमातेचे मंदिरा पर्यंत आरसीसी ड्रेन व पाईप लाईनचे बांधकाम ऑनलाईन नोंदणीकृत कंत्राटदारा मार्फत मंजूर करण्यात आले व सदर रक्कम ही रूपये ३०,८०८४४ (तीस लाख अंशी हजार आठशे चौरेचाळीस) मध्ये मंजुर करण्यात आले व उद्घाटन होऊन कामाला सुरुवात झाली आहे.
सदर बांधकामात अंदाजपत्रकात नमुद तरतुदी नुसार कोणत्याही प्रकारची पुर्तता करण्यात आली नाही. प्रत्यक्ष पत्रकारांनी पाहणी केली असता 80 एमएम गीट्टी वापरली पाहिजे होती पण कंत्राटदारा मार्फत त्या प्रमाणात न वापरता सरळसरळ 40 एमएम गीट्टीने पलोरींग करून त्यावर 11 से.मिटर अंतरावर सलाखीचे बार बांधण्यात आले आहे व सीडी वर्क मध्ये नाहीचे बराबर सलाखीचे बार वापरण्यात आलेली आहेत. एकंदरीत ह्या कामाची दर्जा तपासणी टीमच्या माध्यमातून तपासणी केल्यास सत्य उघडकीस येईल व दुधाचा दुध व पाण्याचे पाणी दिसुन येईल.