उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- स्वामिनी विधवा विकास मंडळाच्या संस्थापिका आणि असंख्य निराधार, एकल महिलांच्या प्रेरणास्थान वीरस्री स्व. लताताई देशमुख पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
स्वामिनी विधवा विकास मंडळ आणि स्वामिनी संघटना अकोला यांचे वतीने स्वामिनी कार्यालय, कुणाल कॉम्प्लेक्स, रणपिसे नगर चौक, अकोला येथे सोमवारी दि. 25 डिसेंबर रोजी दु. १ ते २ या वेळेत सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात एकल महिला धोरण आणि शासकीय भूमिका याविषयी चर्चा करण्यात येणार असून विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी आयोजकांकडून करण्यात आले आहे.