बालाजी शिंदे, पुणे शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यात दिवसांन दिवस क्राईम मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आता तर चक्क एका नियुक्त पोलिसावर हल्ला करण्यात आल्याने एकच खळबळ माजली आहे. त्यामुळे नागरिक पाठोपाठ पोलीस पण सुरक्षित नाही काय अशा सवाल पुणेकर करत आहे.
पुणे येथील वानवडी परिसरात निवृत्त पोलीस निरीक्षक वजीर शेख यांच्यावर शुक्रवारी रात्रीच्या सुमारास हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. वजीर शेख यांना दगडाने ठेचण्यात आले आहे. या जीवघेण्या हल्ल्यात वजीर शेख गंभीररित्या जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे.
शेख यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, हल्लेखोराचे नाव निष्पन्न झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सध्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. वजीर शेख काही महिन्यांपूर्वी पोलीस दलातून निवृत्त झाले होते. ते सध्या कोंढवा परिसरात राहायला आहेत. शुक्रवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास हल्लेखोराने त्यांना गाठत प्राणघातक हल्ला केला. त्यांच्यावर वानवडी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वानवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्ल्यात शेख गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी वानवडी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.